Covid-19 Sakal
पुणे

पुणे : कोरोनाच्या बीए. २.७५ व्हेरिएंटची रुग्णसंख्या ३२

राज्यात कोरोनाच्या ओमिक्रॉन या व्हेरिएंटचा नवीन उपप्रकार असलेल्या ‘बीए २.७५’चे ३२ रुग्ण आतापर्यंत आढळले आहेत. हे सर्व रुग्ण खडखडीत बरे झाले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

राज्यात कोरोनाच्या ओमिक्रॉन या व्हेरिएंटचा नवीन उपप्रकार असलेल्या ‘बीए २.७५’चे ३२ रुग्ण आतापर्यंत आढळले आहेत. हे सर्व रुग्ण खडखडीत बरे झाले आहेत.

पुणे - राज्यात कोरोनाच्या ओमिक्रॉन या व्हेरिएंटचा नवीन उपप्रकार असलेल्या ‘बीए २.७५’चे ३२ रुग्ण आतापर्यंत आढळले आहेत. हे सर्व रुग्ण खडखडीत बरे झाले आहेत.

राज्यात जानेवारीमध्ये कोरोनाचा ओमिक्रॉन नवीन व्हेरिएंटचा उद्रेक झाला. यामुळे कोरोनाची तिसरी लाट राज्यात आली. डेल्टाच्या तुलनेत ओमिक्रॉनच्या उद्रेकात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत होती. मात्र, त्यात रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावे लागत नव्हते, हा मोठा दिलासा यातून मिळाला. या पार्श्वभूमीवर ओमिक्रॉनच्या व्हेरिएंटमध्ये अजून उपप्रकार दिसून येत आहेत. त्यात ‘बीए. २’ हा सहजतेने दिसत आहे. मात्र, त्यानंतर गेल्या काही महिन्यांमध्ये ‘बीए. ४’ आणि ‘बीए. ५’ हे नवीन उपप्रकार आढळून आले. त्या पाठोपाठ आता ‘बीए. २.७५’ हा उपप्रकार दिसून आला.

राज्यात ‘बीए. ४’ आणि ‘बीए. ५’ या व्हेरिएंटचे ६ रुग्ण आणि ‘बीए. २.७५’ चे ३ रुग्ण गेल्या चोवीस तासांमध्ये आढळून आले. पुण्यातील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाने दिलेल्या ताज्या अहवालानुसार राज्यात ‘बीए. ४’चे २ तर ‘बीए. ५’ चे ४ रुग्ण आढळले आहेत. या शिवाय ‘बीए. २.७५’ या व्हेरिएंटचेदेखील ३ रुग्ण आढळले आहेत. हे सर्व रुग्ण पुण्यातील आहेत.

हे सर्व नमुने ३१ मे ते ५ जुलै २०२२ या दरम्यान पुणे, नगर, सिंधुदुर्ग आणि सोलापूर जिल्ह्यातील नमुने तपासण्यासाठी घेण्यात आले. त्यातून या रुग्णांमध्ये हे उपप्रकार आढळले आहेत. हे सर्व घरगुती विलगीकरणात बरे झाले आहेत, अशी माहिती राज्याच्या सार्वजनिक आरोग्य खात्यातर्फे कळविण्यात आली. यामुळे राज्यात आतापर्यंत आढळलेल्या बीए. ४ आणि बीए. ५ रुग्णांची संख्या ७९ तर बीए. २.७५ रुग्णांची संख्या ३२ झाली आहे, असेही खात्याने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT