corona pune 
पुणे

Pune Corona Update: पुण्यात कोरोना रुग्ण संख्येचा नवा उच्चांक; चिंता वाढली

सकाळन्यूजनेटवर्क

पुणे- पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे.  शहरात आज पुन्हा कोरोना रुग्ण संख्येचा नवा उच्चांक पाहायला मिळाला. गेल्या 24 तासांत शहरात ३५०९ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. दिवसभरात १४१० रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आलाय. पुण्यात गेल्या 24 तासांत 33 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झालाय. यातील 9 रुग्ण पुण्याच्या बाहेरचे आहेत.  सध्या ५८९ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरु आहेत. पुण्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या  २४४३४३ झाली आहे. शहरात सध्या २६५१५ कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. आतापर्यंत ५११४ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजपर्यंत २१२७१४ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज शहरात १६१८५ कोरोना चाचण्या घेण्यात आल्या होत्या. मुंबईमध्ये कोरोना रुग्णसंख्येने 5 हजारांचा टप्पा पार केलाय. त्यामुळे स्थिती गंभीर होताना दिसत आहे. 

दरम्यान, देशभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. विशेषत: महाराष्ट्र आणि पंजाब राज्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्येचा उद्रेक पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत 31,855 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत, तर 15098 जणांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. बुधवारी 95 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. कोरोना रुग्णसंख्या गेल्या काही दिवसांपासून वाढ होत असल्याचं पाहायला मिळतंय.

मंगळवारी राज्यात 28 हजारांच्या जवळपास कोरोना रुग्ण आढळून आले होते, तर सोमवारी 25 हजारांच्या जवळपास कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. रविवारी कोरोना रुग्णांची संख्या 30 हजारांच्या पुढे गेली होती, ती आता पुन्हा 32 हजारांच्या जवळ गेलीये. त्यामुळे कोरोना रुग्णसंख्येमध्ये चढउतार पाहायला मिळतोय. आरोग्य विभागाने यासंदर्भातील माहिती दिलीये.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : राज्यात परतीच्या पावसाचा जोर वाढणार; विदर्भ-मराठवाड्यासह २९ जिल्ह्यांना येलो अलर्ट

Chana Moong Dal Chilla: हेल्दी नाश्ता म्हणजे बेचव नाही! असा बनवा चणे-मूग चिला! खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल

आजचे राशिभविष्य - 23 सप्टेंबर 2026

Azamgarh Hostage Crisis : आझमगढ हादरलं! आधी पत्नी अन् दोन पुजाऱ्यांची हत्या, मग मुलावर झाडली गोळी; ८ तासांच्या ऑपरेशननंतर आरोपीचा एन्काउंटर

Sangli ACB Trap : भूमी अभिलेखमधील दोघे लाच घेताना जाळ्यात; ईश्‍वरपुरात रचला सापळा, प्रॉपर्टी कार्डावर क्षेत्र दुरुस्तीसाठी घेतले 50 हजार

SCROLL FOR NEXT