पुणे

Pune Corona Update: दिलासादायक! 10 दिवसांत शहरातील रुग्णांची संख्या साडेआठ हजारांनी कमी

सकाळ डिजिटल टीम

पुणे : पुणे शहरातील एकूण सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होऊ लागली आहे. गेल्या दहा दिवसांच्या तुलनेत आजअखेरपर्यंत (ता.३०) सक्रीय रुग्णांची संख्या ८ हजार ६७६ ने कमी झाली आहे. सध्या शहरात ४३ हजार २४४ सक्रिय कोरोना रुग्ण आहेत.

शहरातील एकूण सक्रीय रुग्णांपैकी ९ हजार ५६३ रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शिवाय ३३ हजार ६८१ रुग्ण गृह विलगीकरणात आहेत. दहा दिवसांपूर्वी एकूण सक्रीय रुग्णांची संख्या ५१ हजार ९२० इतकी होती, असे जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने जाहीर करण्यात आलेल्या दैनंदिन आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, पुणे जिल्ह्यात आज ९ हजार ७६० नवे रुग्ण आढळून आले आहेत. आजच्या एकूण रुग्णांत शहरातील ४ हजार ११९ रुग्ण आहेत. आज ९ हजार ८२२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. एकूण कोरोनामुक्तांमध्ये शहरातील सर्वाधिक ५ हजार १३ रुग्ण आहेत. अन्य १५२ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. दिवसातील एकूण मृत्यूमध्ये शहरातील ६५ मृत्यू आहेत.

दिवसभरात आढळून आलेल्या नवीन रुग्णांत पिंपरी-चिंचवडमध्ये २ हजार ०६, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात २ हजार ९९२, नगरपालिका हद्दीत ५४८ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात ९५ नवे रुग्ण सापडले आहेत. आज पिंपरी चिंचवडमधील ४६, ग्रामीण भागातील ३७ आणि नगरपालिका व कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील प्रत्येकी दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Himachal Pradesh High Court: मानवी दात धोकादायक शस्त्र नाही’ हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचा निर्णय

मातीत राबणारेच मातीला मिळाले! महाराष्ट्रात 8 महिन्यांत तब्बल 1183 शेतकऱ्यांनी संपवलं जीवन, धक्कादायक आकडेवारी समोर...

Explained: बदलत्या वातावरणाचा लहान मुलांना कोणते आजार होतात अन् सर्दी- खोकल्यार आयुर्वेदानुसार कोणते घरगुती उपाय केले पाहिजे? वाचा डॉक्टर काय सांगतात

Pregnant Woman Killed : पतीकडून गर्भवती पत्नीचा मोटारीने उडवून खून, अपघात भासविण्याचा प्रयत्न; सासू, पतीकडून वारंवार छळ

France Mosque Incident : धक्कादायक! नऊ मशिदींबाहेर आढळली डुकरांची मुंडकी; पाच मशिदींवर राष्ट्रपतींचं निळ्या रंगात लिहिलं नाव, मुस्लिम समाजात तीव्र संताप

SCROLL FOR NEXT