Pune Municipal Corporation sakal
पुणे

पुणे महापालिका मर्जीतील ठेकेदारांवर 'मेहेरबान'

मध्यवर्ती भांडार विभागाच्या स्टेशनरी खरेदी निविदेतील घोळ

सकाळ वृत्तसेवा

पुणे : महापालिकेच्या (Pune corporation) मध्यवर्ती भांडार विभागाच्या स्टेशनरी खरेदीच्या निविदेतील घोळ वाढतच चालला आहे. निविदा पूर्व बैठक घेणे, निविदा भरलेल्या सर्व ठेकेदारांसमोरच सॅम्पल उघडणे यासह विविध नियमांना फाटा दिल्याची माहिती समोर आली आहे. (pune corporation Break the rules preferred contractor)

महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांना स्टेशनरी पुरविण्यासाठी सुमारे ६६ लाख रुपयांची निविदा मध्यवर्ती भांडार विभागाकडून काढण्यात आली आहे. त्यात झालेला गैरप्रकार ‘सकाळ’ने गुरुवारी सर्वप्रथम उघडकीस आणला. त्यातून अनेक गोष्टी समोर येऊ लागल्या आहेत. नियमानुसार निविदा उघडण्यापूर्वी सर्व ठेकेदारांची निविदा पूर्व (प्री बिड मिटींग) बैठक घेतली जाते. ती खात्याकडून घेण्यात आली नाही. तसेच ज्या ठेकेदारांनी निविदा भरल्या आहेत, त्या सर्व ठेकेदारांच्या समोर सॅम्पल उघडणे कायद्याने अपेक्षित आहे. परंतु, तसे न करता मर्जीतील एकाच ठेकेदाराच्या समोर त्या उघडण्यात आल्या.

जेणेकरून अन्य ठेकेदारांना अपात्र करणे शक्य व्हावे. याशिवाय, आर्थिक आणि टेक्निकल अशी दोन्ही पाकिटे ओपन केल्यानंतर सर्व ठेकेदारांना कागदपत्रे खुली झाली पाहिजेत. मात्र, ‘एओसी’ ओपन करण्यात आली नाही. त्यामुळे ठेकेदारांना कोणतीही माहिती मिळू नये, असे प्रकार केल्याचे समोर आले आहेत.

वस्तूंमध्ये मोठी तफावत

स्टेशनरी खरेदी करताना निविदेत दिलेल्या अटी आणि प्रत्यक्षात महापालिकेला पुरविण्यात येणाऱ्या वस्तू, यांच्यामध्ये मोठी तफावत असल्याचे खात्यातील काही अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळेच अटी-शर्तीमध्ये वस्तूचे चुकीचे स्पेसिफिकेशन टाकून अन्य ठेकेदार कंपन्यांना बाद करायचे आणि मर्जीतील ठेकेदाराला काम मिळण्यासाठी बदल करणे. त्यानुसार पुरवठा झाला नाही, तरी गप्प राहायचे, असे प्रकार सर्रासपणे केले जात असल्याचे काही कर्मचाऱ्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT