पुणे

महापालिकेच्या सभागृहात विरोधी पक्षांचे आंदोलन

CD

पुणे, ता. २२ : महापालिका सभागृहात नगरसेवक गफूर पठाण यांना भाजप नगरसेवकांनी केलेल्या धक्काबुक्की, दमदाटी प्रकरणावरून सोमवारी (ता. २२) विरोधी पक्षांनी सभागृहात तीव्र आंदोलन केले. हाताला काळ्या फिती बांधून, तसेच चिलखत व हेल्मेट परिधान करत विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली.
महापालिकेच्या १७ जूनला झालेल्या सर्वसाधारण सभेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नगरसेवक गफूर पठाण यांनी बोपोडी येथील धार्मिक स्थळाच्या कारवाईविरुद्ध आवाज उठविला होता. त्यावेळी भाजपच्या नगरसेवकांनी पठाण यांच्या अंगावर धावून जात त्यांना धक्काबुक्की, दमदाटी केली होती. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, काँग्रेस पक्ष व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांच्यावतीने पत्रकार परिषद घेत तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता.
सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येत महापौर मंजूषा नागपुरे यांच्यासमोर आंदोलन केले. सभागृहातील सुरक्षेच्या मुद्द्यावर प्रशासनाला धारेवर धरले. तसेच विरोधी पक्षाच्या नगरसेवकांना सुरक्षा देण्यासह भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी महापौर नागपुरे यांच्याकडे केली.
या आंदोलनात विरोधी पक्षनेते ॲड. नीलेश निकम, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते काका चव्हाण, काँग्रेसचे गटनेते चंदूशेठ कदम, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गटनेते नितीन गावडे, नगरसेवक अरविंद शिंदे आदींसह विरोधी पक्षाच्या सर्व नगरसेवकांचा यात सहभाग होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Citizen Participation Budget: पुणे महापालिकेचा लोकाभिमुख अर्थसंकल्प: नागरिकांना ३१ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन विकासकामे सुचविण्याची संधी

Pune Road Safety: राजाबहादूर मील रस्त्यावर बिल्डरची मुजोरी कायम; चिखलामुळे अपघात, महापालिकेचा दंड व काम थांबवण्याचा इशारा

Agni 4 missile: 'डीआरडीओ'कडून 'अग्नी-4' ची यशस्वी चाचणी, तब्बल चार हजार किलोमीटरपर्यंतचे लक्ष्य भेदणार!

''Gen Z सगळ्यात प्रामाणिक पिढी, सरकारने आधीच बोलणी करायला पाहिजे होती'', सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले?

Pune civic roads issue: पुण्यात खड्ड्यांचा मारा कायम; महापौरांचा ‘यंदा खड्डे कमी’ दावा, स्थायी समिती अध्यक्षांनी शहरात भरपूर खड्डे असल्याचे मान्य

SCROLL FOR NEXT