Corona-patient
Corona-patient 
पुणे

पुणे : सलग दुसऱ्या दिवशी कोरोनामुक्त रुग्ण वाढले; 812 नवे रुग्ण

सकाळवृत्तसेवा

पुणे - पुणे जिल्ह्यात शुक्रवारी (ता.4) सलग दुसऱ्या दिवशी दिवसभरातील कोरोनामुक्त रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. जिल्ह्यात आज 812 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. याउलट 1 हजार 113 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिवसभरातील एकूण कोरोना रुग्णांत पुणे शहरातील 366 जण आहेत. गेल्या 24 तासांत 8 हजार 754 कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. अन्य 17 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण मृत्यूंमध्ये पुणे शहरातील चार, पिंपरी चिंचवडमधील सात आणि जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील पाच आणि नगरपालिका कार्यक्षेत्रातील एका रुग्णाचा समावेश आहे. कॅंन्टोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील एकाही रुग्णाचा आज मृत्यू झाला नाही.

आज पुणे शहरात 366, पिंपरी चिंचवडमध्ये 149, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात 213, नगरपालिका कार्यक्षेत्रात 80 आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात 4 नवे रुग्ण आढळून आले आहेत.

जिल्ह्यात सध्या विविध रुग्णालयात 4 हजार 219 कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. तसेच 6 हजार 704 रुग्णांवर त्यांच्या घरातच उपचार करण्यात येत आहेत. आतापर्यंत 8 हजार 466 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण मृत्यू झालेल्यांमध्ये पुणे जिल्ह्याबाहेरील 406 रुग्ण आहेत. नवे कोरोना रुग्ण आणि रुग्णांच्या मृत्यूची संख्या ही काल (ता.3) रात्री आठ वाजल्यापासून आज (ता.4) रात्री आठ वाजेपर्यंतची आहे.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : भारतातील निवडणूक प्रक्रिया पाहण्यासाठी आले 23 देशांमधील पाहुणे

ISL vs IPL : पीसीबी घेणार मोठा पंगा; आयपीएल अन् पीएसएलमध्ये होणार टक्कर

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : ऋतुराजने पुन्हा नाणेफेक गमावली; पंजाबने घेतला गोलंदाजीचा निर्णय

Sushilkumar Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेची चटक;ही निवडणूक हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची

Prasad Khandekar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची खास पोस्ट; दहा वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करत म्हणाली...

SCROLL FOR NEXT