पुणे

Pune Crime News: मुळशीच्या जमिनीचा वाद; दुहेरी हत्याकांडातील सात आरोपींना जन्मठेप

हरिदास कड

चाकण: मुळशी तालुक्यातील माण गावच्या हद्दीतील एका जमिनीच्या वादातून चाकण येथे बाजारात आलेल्या दोघांना आरोपीनी पळवून नेऊन त्यांना आडरानात नेऊन लाकडी दांडके व दगडाने ठेचून दोघांचा खून केला होता. त्या नऊ आरोपी पैकी सात आरोपींना राजगुरुनगरच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ए. एस. सय्यद यांनी आज जन्मठेपेची शिक्षा सुनावली. यातील एका आरोपीचा मृत्यू झालेला आहे.अशी माहिती चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी दिली.

मुळशी तालुक्यातील माण येथील एका जमिनीच्या वादातून दोघांचा खून करण्यात आला होता. पंढरीनाथ सदाशिव पारखी (वय -60),चंद्रकांत उर्फ पप्पू ज्ञानोबा पारखी (वय -37 वर्ष )या दोघां चुलता, पुतण्याचा खून करण्यात आला होता.या खूनप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात आरोपी रोहिदास जयसिंग ठाकर (वय -39 वर्ष )राजू जयसिंग ठाकर (वय -39 वर्ष )संतोष जयसिंग ठाकर( वय-36 वर्ष )प्रीतम पंडित ठाकर( वय -१९ वर्ष )जगदीश शिवाजी ठाकर ( वय -21 वर्ष ),चंद्रशेखर शिवाजी ठाकर (वय -१९ वर्ष )तुषार प्रल्हाद ठाकर (वय -19 वर्ष ) रघुनाथ दामू पारखी (वय -57 वर्ष )सर्व रा. माण,ता. मुळशी अशी न्यायालयाने जन्मठेप शिक्षा सुनावलेल्या आरोपींची नावे आहेत.

आरोपी रोहिदास याचा मृत्यू झालेला आहे. ही घटना 11 जुलै 2009 रोजी दुपारच्या सुमारास चाकण जवळील पिंपरी खुर्द, ता. खेड गावच्या हद्दीत घडलेली होती. वाद असलेली ही कुटुंबे माण येथील आहेत.खून झालेल्या चंद्रकांत उर्फ पप्पू पारखी याने खरेदी केलेली 73 गुंठे जमीन मयत आरोपी रोहिदास ठाकर याला विक्रीच्या हेतूने साठेखत करून दिली होती. ठाकर याला मुदतीत हा व्यवहार पूर्ण करता आला नाही त्यावरून पुणे न्यायालयात वाद सुरु होता.न्यायालयाने खून झालेल्या पारखी यांच्या बाजूने निकाल दिला होता त्याचा राग ठाकर परिवाराला होता.

घटनेच्या दिवशी चंद्रकांत व त्याचे चुलते पंढरीनाथ हे चाकण येथील जनावरांच्या बाजारात मुळशी येथून चार चाकी वाहनाने आले होते. त्यांच्यासोबत आरोपी रघुनाथ पारखी होते. पारखी या आरोपीने खुनाचा कट रचल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले होते. बाजारातील काम उरकल्यानंतर पंढरीनाथ पारखी व चंद्रकांत पारखी हे दोघे चाकण रोहकल रस्त्याने पंढरीनाथ पारखी यांच्या मुलीच्या घरी गेले होते तेथे तिघेजण थांबले.तेथून ते बाहेर पडले तेव्हा जवळच लपून बसलेल्या आरोपींनी त्यांना गाठले त्यांना जबरदस्तीने पिंपरी खुर्द गावच्या माळरानावर नेऊन त्या दोघांवर लाकडी दांडके आणि दगडांनी हल्ला केला. त्या भीषण हल्ल्यात दोघांचा जागीच मृत्यू झाला होता.

खुनाचा सुगावा लागू नये म्हणून आरोपीनी पुरावे नष्ट केले. खून झालेल्या पंढरीनाथ यांचा मुलगा संदीप पारखी यांनी चाकण पोलिसात खुनाच्या घटनेची फिर्याद दिली होती. तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश घाडगे यांनी या प्रकरणाचा तपास केला होता. त्यानंतर तपास सीआयडी कडे देण्यात आला होता.पोलीस निरीक्षक दिपाली घाडगे यांनीही तपास करून आरोपपत्र दाखल केले. विशेष सरकारी वकील विकास सावंत यांनी खून झालेल्या पारखी यांची बाजू न्यायालयात मांडली. वीस साक्षीदार तपासण्यात आले. साक्ष आणि पुराव्यानुसार निर्दयीपणे खून करणाऱ्या आरोपींना न्यायाधीश सय्यद यांनी जन्मठेप, दोन हजार रुपये दंड,अपहरण व कट कारस्थान यासाठी पाच वर्षे सश्रम करावास अशी शिक्षा सुनावली आहे.चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी प्रभारी अधिकारी म्हणून काम पाहिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऐन दिवाळीत तंत्रज्ञानाचा फुसका बार! Canva अन् Amazon ची सेवा ठप्प; युजर्सला येतायेत अडचणी...

Stock Market Closing: दिवाळीनिमित्त बाजारात उत्साह; निफ्टी 25,843 वर बंद; उद्या होणार मुहूर्त ट्रेडिंग

Cricketer Retirement: भारताच्या ३६ वर्षीय क्रिकेटपटूने अचानक घेतला निवृत्तीचा निर्णय; दोनदा जिंकला होता BCCI चा पुरस्कार

Diwali festival : भारतात एक राज्य असंही जिथं आजही बहुतांश लोक दिवाळीच करत नाहीत साजरी, कारण...

Bhavish Aggarwal: ओलाचे सीईओ भाविश अग्रवाल यांच्याविरुद्ध FIR दाखल; त्रासाला कंटाळून कर्मचाऱ्याने संपवलं जीवन

SCROLL FOR NEXT