Crime News esakal
पुणे

संचारबंदीत सिंहगडाच्या पायथ्याशी डान्स पार्टी; पोलीसांचा छापा

निलेश बोरुडे

किरकटवाडी - सिंहगड किल्ला, डोणजे व आजुबाजूच्या परिसरात संचारबंदी असताना सिंहगड किल्ल्याच्या पायथ्याशी गोळेवाडी येथे सानवी रिसॉर्टमध्ये सुरू असलेल्या डान्सपार्टीवर पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून हॉटेल मालकासह सहा पुरुष व चार महिलांवर गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये हॉटेल मालकाचा मित्र असलेला व आंबेगाव कात्रज परिसरात मोठे हॉस्पिटल असलेला डॉक्टर पळून जाण्यात यशस्वी झाला आहे.

याप्रकरणी हॉटेल मालक विनय सुभाष कांबळे (वय-32, रा. आकाशनगर,वारजे.), संदिप शंकर कोतवाल (वय-47, रा. हिंगणे मळा, हडपसर), सचिन विठ्ठल शिंदे (वय-38, रा.आनंदनगर, सिंहगड रोड.) कालिदास शशिराव काकडे (वय-50, रा. संस्कृती सोसायटी, हडपसर.), विठ्ठल विजय मोरे (वय-43, रा. साईनगर, हडपसर.), राजेश बलभीम वाघमारे (वय-45, रा.ससाणेनगर, हडपसर.) यांच्यासह चार महिलांवर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी हवेली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस शिपाई अमोल शेडगे यांना सिंहगडाच्या पायथ्याशी गोळेवाडी येथील सानवी रिसॉर्टमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग करुन डान्सपार्टी सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे, पोलीस हवालदार ज्ञानेश्वर क्षिरसागर, हनुमंत पासलकर, महिला पोलीस हवालदार नंदा कदम, पोलीस शिपाई मंगेश भगत, अमोल शेडगे यांच्या पथकाने दि. 24 जुलै रोजी रात्री उशिरा ही कारवाई केली.

डॉक्टर फरार कसा झाला? गुन्हाही दाखल नाही

डान्स पार्टीत सहभागी असलेला व पार्टीच्या मुख्य सुत्रधारांपैकी एक डॉ. निखिल भाकरे हा पोलीस आल्यानंतर अंधाराचा फायदा घेऊन फरार झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे मात्र असे असताना सदर डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. त्यामुळे पोलीसांकडूनच या डॉक्टरला वाचविण्याचा प्रयत्न झाला आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi Language: मोठी बातमी! रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी मुदतवाढ, राज्य सरकारचा निर्णय

AUS vs BAN : ऐ, निघ इथून! मिचल स्टार्क अन् मेहिदी हसन मिराझ यांच्यात शाब्दिक खडाजंगी; बांगलादेशच्या हल्ल्याने कांगारू बिथरले Video

आफ्रिकेत Business करायचाय? दक्षिण आफ्रिकेच्या Consul General नी सांगितला ‘गेटवे’ फॉर्म्युला

Maruti Suzuki Offer: ऑगस्टमध्ये कार खरेदीची मोठी संधी! तब्बल 1.85 लाखांपर्यंत फायदा; Grand Vitara, Balenoसह कोणत्या कारवर किती ऑफर?

Marathi News Live Updates : स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर! दिल्लीतील प्रमुख ठिकाणांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी

SCROLL FOR NEXT