thieft
thieft Sakal
पुणे

जामीनावर सुटल्यानंतरही सराईत गुन्हेगाराकडून पुन्हा घरफोडी

सकाळ वृत्तसेवा

पुणे : चोरी, घरफोडीच्या गुन्ह्यात अटक झाल्यानंतर कारागृहात रवानगी झालेल्या सराईत गुन्हेगाराची जामीनावर मुक्तता झाली. त्यानंतरही गुन्हेगाराने शहराच्या वेगवेगळ्या भागात घरफोड्या केल्याचे उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी त्यास बेड्या ठोकल्या. त्याने घरफोडीचे चार गुन्हे केले असून आत्तापर्यंत पावणे पाच लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. (Pune Crime News)

चंद्रकांत उर्फ चंद्या अनंत माने (वय 29, रा, चाफेकर चौक, चिंचवड गाव) असे अटक केलेल्याचे नाव आहे. भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत घरफोडीची घटना घडली होती. या गुन्ह्याचा भारती विद्यापीठ पोलिस व गुन्हे शाखेच्या युनीट दोनच्या पथकाकडून समांतर तपास सुरू होता. दरम्यान, घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार जामीनावर सुटल्यानंतरही पुन्हा घरफोड्या करीत असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती.

त्यानुसार, गुन्हे शाखेच्या युनीट दोनच्या पोलिसांनी आरोपीस बेड्या ठोकल्या. त्यावेळी त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यास अटक केल्यानंतर पोलिस कोठडी मिळाली. तेव्हा त्याने घरफोडीचे आणखी तीन गुन्हे केल्याचे सांगितले. त्यानुसार, पोलिसांनी त्याच्याकडून चोरलेले सोन्याचे, चांदीचे दागिने, रोख रक्कम व गुन्हा करण्यासाठी वापरलेली हत्यारे असा एकूण पावणे पाच लाख रुपयांचा ऐवज जप्त केला.

चंद्रकांत माने हा सराईत गुन्हेगार असून तो सातत्याने घरफोडी करीत असतो. त्याने आत्तापर्यंत शहराच्या वेगवेगळ्या भागात 30 हून अधिक गुन्हे केल्याचे उघड झाले आहे. त्याला यापुर्वीच पोलिसांनी अटक केली होती. त्याची रवानगी कारागृहामध्ये करण्यात आली होती. मात्र तेथे जामीनावर मुक्तता झाल्यानंतर तो बाहेर पडला. त्यानंतर त्याने पुन्हा घरफोड्या करण्यास सुरू केल्याची माहिती चौकशीतुन पुढे आली. बंद घरांची पाहणी करून तो रात्रीच्यावेळी घरफोड्या करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. सहाय्यक पोलिस आयुक्त गजानन टोम्पो यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhagan Bhujbal: "काँग्रेस मला मुख्यमंत्रीपद देण्यास तयार होती, मात्र मी..."; भुजबळांची शरद पवारांच्या गौप्यस्फोटावर प्रतिक्रिया

SRH vs PBKS Live Score : हैरदाबादचा डोळा दुसऱ्या क्रमांकावर; पंजाबचा नवा कर्णधार शेवट गोड करण्यासाठी उत्सुक

Anil Kapoor : "सहजीवनाची 51 वर्षं..."; लग्नाच्या वाढदिवसाला अनिल यांची पत्नीसाठी इमोशनल पोस्ट

Soni Razdan: आलिया भट्टच्या आईसोबत फसवणुकीचा प्रयत्न; म्हणाल्या, "त्यांनी मला फोन केला आणि..."

RCB vs CSK : आरसीबीपाठोपाठ जिओ सिनेमाचीही बल्ले-बल्ले, मिळाली छप्पर फाड के व्ह्युवरशिप; सगळे रेकॉर्ड ब्रेक

SCROLL FOR NEXT