pune sakal
पुणे

Pune Crime News : एटीएममधून रोकड चोरणाऱ्या उत्तरप्रदेशातील टोळीला अटक; अप्पा बळवंत चौकाजवळ भरदिवसा घडली घटना

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारवाडा आणि अप्पा बळवंत चौकादरम्यान खासगी बँकेचे एटीएम आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - चोरट्यांनी बॅंकेचे एटीएम मशिन उचकटून चोरीचा प्रयत्न केल्याची घटना शहराच्या मध्यवर्ती भागात अप्पा बळवंत चौकापासून काही अंतरावर घडली. या प्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी उत्तरप्रदेशातील टोळीतील चार जणांना अटक केली आहे.

याबाबत सुरक्षा एजन्सीचे व्यवस्थापक मनैय्या टणकेदार (वय २३, रा. शिवणे) यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तर आशिष हरिकेश विश्वकर्मा (वय ३०), नायब लालचंद पटेल (वय २८), मनीष मुन्ना पांडे (वय ३१) आणि कमल राजकुमार विश्वकर्मा (वय २२, सर्व रा. प्रतापगड, उत्तर प्रदेश) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारवाडा आणि अप्पा बळवंत चौकादरम्यान खासगी बँकेचे एटीएम आहे. चोरट्यांनी मंगळवारी या एटीएममधून रोकड चोरी केली. तसेच अन्य एका एटीएममध्ये तोडफोड करून रोकड चोरण्याचा प्रयत्न केला. याबाबत माहिती मिळताच विश्रामबाग पोलिसांनी तपास करून चोरट्यांना बेड्या ठोकल्या. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक मनोज बरुरे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Black Magic Ritual: महाराष्ट्र हादरला! सोळा वर्षीय मुलीवर अघोरीकृत्य, वर्षभरापासून सुरू होता प्रकार! शेवपेटीत झोपवायचा अन्...

Latest Maharashtra News Updates : पंचगंगेच्या पाणीपातळीत अर्ध्या फुटाने घट; कोल्हापुरात अद्यापही ४८ बंधारे पाण्याखाली

Vidarbha Rain: विठ्ठल पावला... विदर्भात पावसाची संततधार; यवतमाळात नदी नाल्यांना पूर, नागपूर, भंडारा, गोंदिया, सर्वत्र पावसाचा संचा

Hinjawadi IT Park : हिंजवडीमधील समस्यांचा मुख्यमंत्री घेणार आढावा; आमदार महेश लांडगे यांचा पुढाकार

Basmat Crime: विदर्भातील तरुणीवर प्रेमाच्या नावाखाली अत्याचार; वसमतमधील आरोपी अटकेत

SCROLL FOR NEXT