Crime News esakal
पुणे

Pune Accident: दुर्दैवी! पुण्याच्या वाघोलीत ट्रकखाली सापडून एकोणीस वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू

सकाळ डिजिटल टीम

वाघोली: बोअरवेल ट्रकखाली सापडल्याने दुचाकीवरील तरुणीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना वाघोली-केसनंद रस्त्यावरील नायरा पेट्रोलपंपासमोर घडली. यात दुचाकीवरील तरुणही जखमी झाला आहे.

गौरवी रवींद्र जाधव (वय १९, सध्या रा. गुलमोहर सोसायटी, वाघोली, मूळगाव - कोल्हापूर) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आशिषकुमार व गौरवी हे दोघे दुचाकीवरून जात असताना ट्रकचा दुचाकीला धक्का लागल्याने ते दोघे खाली पडले.

ती त्याच ट्रकच्या मागील चाकाखाली आल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी ट्रकचालक लक्ष्मण चिन्नास्वामी (वय ३९, रा. कोलवडी) याला अटक करण्यात आली आहे. गौरवीचे एअर होस्टेज बनण्याचे स्वप्न होते. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक महादेव लिंगे करीत आहेत.

पीएमपी बंद पडल्याने मुंढव्यात प्रवाशांना मनस्ताप

केशवनगरहून शनिवारवाडा येथे ४५ प्रवासी घेऊन निघालेली पीएमपी (बस क्रमांक १६९) ही बधेवस्ती या ठिकाणी गॅस लिकेज असल्यामुळे बंद पडली. त्यामुळे प्रवाशांना मनस्तापाला सामोरे जावे लागले.

प्रवाशांना दुसऱ्या बससाठी भर उन्हात अर्धा तास थांबूनही पुण्याकडे जाण्यासाठी बस मिळाली नसल्याने लहान मुले, वृद्ध महिलांसह, ज्येष्ठ नागरिकांना तसेच कामगार वर्गाला कामावर वेळेत न पोचल्याने भुर्दंडासह मनस्ताप सहन करावा लागला.

महापालिकेने बस तपासणी करून मगच रस्त्यावर सोडावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे. त्यामुळे पीएमपी प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाच्या विरोधात प्रवासी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करत होते. यासंदर्भात पीएमपी प्रशासनाशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Play Off Scenario: गुजरात टायटन्सचा सलग पाचवा विजय! सनरायझर्स हैदराबादला नमवून POINT TABLE मध्ये अव्वल, अनपेक्षित कलाटणी

IPL 2026 : चेन्नई सुपर किंग्सच्या संघात बदल... प्ले ऑफच्या शर्यतीसाठी मिळालं बळ... पुण्याच्या रामकृष्ण घोषच्या जागी एन्ट्री

Triple Accident : रजापूर शिवारात तिहेरी अपघात; वाळू वाहतूक करणारा हायवा पलटी, दोन कारची धडक, चार ते पाच जण किरकोळ जखमी

Amit Satam: पंतप्रधानांच्या 'इंधन बचती'ला मुंबई भाजपचा हरताळ; अमित साटम यांचा २५ गाड्यांचा 'शाही' ताफा वादाच्या भोवऱ्यात!

GT vs SRH Live : टप्पा खाऊन आऊट... अभिषेक शर्मा विचित्र पद्धतीने बाद झाला, कागिसो रबाडाला हसू आवरेना... Video Viral

SCROLL FOR NEXT