crime sakal media
पुणे

Pune Crime : गुंगीचे औषध देऊन तरुणीवर बलात्कार

एका अज्ञात व्यक्तीवर याप्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

सकाळ वृत्तसेवा

पुणे : उत्पादनाबाबत माहिती देण्याचा बहाणा करून तरुणीला लॉजमध्ये नेऊन एकाने तिला शीतपेयातुन गुंगीचे औषध देत तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. याप्रकरणी एका अज्ञात व्यक्तीवर बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात २५ वर्षीय तरुणीने फिर्याद दिली. त्यानुसार पीडित तरुणी एका कंपनीच्या उत्पादनांची ग्राहकांना माहिती देण्याचे काम करते. त्यातून आरोपीची तिच्यासमवेत ओळख झाली. त्यानंतर आरोपीने या तरुणीला उत्पादनासंदर्भात महिती एका ग्राहकाला देण्याचा बहाणा करून पुणे स्टेशन परिसरातील एका लॉजवर नेले. तेथे तिला शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार केला.

त्याने या घटनेचे व्हिडिओ चित्रीकरणही केले. ते तिच्या पतीला पाठविण्यासह सोशल मीडियावर प्रसारित करण्याची धमकी देत त्याने तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केले. हा प्रकार पीडित तरुणीने कुटुंबीयांना सांगितल्यानंतर त्यांनी पोलिसांत धाव घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ayodhya Ram Mandir Theft : राम मंदिरातील योग केंद्रात काळाबाजार? रहस्यमय पेटीवर QR कोड; अयोध्या राम मंदिर चोरी प्रकरणात धक्कादायक खुलासे

Tukaram Mundhe FDA Raids : तुकाराम मुंढे 'इफेक्ट'! बाजारपेठेतून सुटे तेल गायब, डेअरी व्यावसायिकही अस्वस्थ; अवघ्या 15 दिवसांत महाराष्ट्रातील भेसळखोरांचे धाबे दणाणले

Agriculture Day 2026: नेमका कधी आणि कसा सुरू झाला 'महाराष्ट्र कृषी दिन' ?

IND vs ENG 1st T20I : वैभव सूर्यवंशीचे पदार्पण नाहीच, संजू सॅमसन संघात कायम; पहिल्या ट्वेंटी-२०साठी भारताची संभाव्य Playing XI

Koyna Dam Water Level : ...अखेर दिलासादायक बातमी! तळ गाठणारे कोयना धरण पुन्हा भरणार; महाबळेश्वर-नवजातील पावसाने पाणीसाठ्यात मोठी वाढ, पाहा ताजी आकडेवारी

SCROLL FOR NEXT