crime news
crime news esakal
पुणे

Pune Crime : मुलगा झाला म्हणून फार्महाऊसवर पहाटेपर्यंत रंगलेल्या पार्टीत एका मित्राचा दुसऱ्यावर चाकू हल्ला

निलेश बोरुडे

सिंहगड: मुलगा झाला म्हणून सिंहगडाच्या पायथ्याशी डोणजे गावच्या हद्दीतील पायगुडेवाडी येथील निवांत फार्महाऊसवर पहाटेपर्यंत रंगलेल्या पार्टीत एका मित्राने दुसऱ्या मित्रावर चाकूहल्ला करत गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

धीरज मदन शिंदे(वय26, रा. वडारवाडी, शिवाजीनगर, पुणे) असे जखमी तरुणाचे नाव असून याप्रकरणी सागर सोमनाथ शेलार (वय 23, रा. वडारवाडी, शिवाजीनगर, पुणे.) याच्यावर हवेली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे मात्र पोलिसांच्या आशीर्वादाने पहाटेपर्यंत चालणाऱ्या ओल्या पार्ट्यांचा विषय चव्हाट्यावर आला आहे.

शिवाजीनगर येथील वडारवाडी भागात राहणाऱ्या सलीम जावेद शेख याने मुलगा झाला म्हणून आपल्या चौदा ते पंधरा मित्रांसाठी डोणजे-पायगुडेवाडी रस्त्यावरील निवांत फार्महाऊसवर पार्टी ठेवली होती.

पहाटेपर्यंत पार्टी रंगल्यानंतर सर्वजण शेकोटीभोवती बसले असताना आरोपी सागर शेलार आणि धीरज शिंदे यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाले. त्यावेळी सागर शेलार याने कमरेला लावलेला चाकू काढून धीरज शिंदे याच्या पोटात खुपसला.

धीरज शिंदे याच्या पोटात खोलवर चाकू घुसल्याने मोठी जखम होऊन रक्तस्राव होत होता. इतर मित्रांनी धीरज याला तातडीने उपचारांसाठी रुग्णालयात नेले. सध्या धीरज याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर आहे.

सागर शेलार याच्यावर हवेली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला वारजे भागातून अटक करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पवार याबाबत अधिक तपास करत आहेत.

पहाटेपर्यंत चालतात ओल्या पार्ट्या........... सिंहगड परिसरात अनेक हॉटेल, फार्महाऊस व रिसॉर्ट असून पहाटेपर्यंत राजरोसपणे ओल्या पार्ट्या सुरू असतात. दरम्यानच्या काळात हवेली पोलीस ठाण्याची गस्तीची गाडी फिरत असते परंतु त्यांच्याकडून कोणतीही कारवाई करण्यात येत नाही.

पोलिसांच्या आशीर्वादानेच या पार्ट्या सुरू असतात असा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. या भागात राहणारे नागरिक रात्री अपरात्री जोरजोराने गाण्यांचा आवाज येत असल्याबाबत सातत्याने पोलिस ठाण्याला माहिती देतात परंतु वेळ मारुन नेण्याच्या पलिकडे पोलिस काहीही कारवाई करत नाहीत. याबाबत हवेली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सचिन वांगडे यांचे म्हणणे जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला परंतु त्यांनी उत्तर दिले नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ebrahim Raisi Death: इराणच्या राष्ट्राध्यक्षांच्या हेलिकॉप्टर अपघातामागे षडयंत्र आहे का, नेमकं काय घडलं? इस्रायलच्या भूमिकेबाबत मोठा दावा!

Rohit Sharma : क्रिकेटपटूंची गोपनीयता जपा! ; मुंबई इंडियन्सचा खेळाडू रोहित शर्मा आयपीएल ब्रॉडकास्टरवर भडकला

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील १३ मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.३३ टक्के मतदान

Kalyan News: देशाच्या विकासासाठी मतदार महायुतीच्याच बाजूने, विश्वनाथ भोईरांचे वक्तव्य

Akshay Kumar : अक्षयचा दिलदारपणा; जॉली एलएलबीचं शूटिंग पूर्ण होताच केली 500 मुलींना मदत

SCROLL FOR NEXT