Pune Crime sakal media
पुणे

भावाच्या आत्महत्येचा बदला घेण्यासाठी केले 'ती'च्या मुलाचे अपहरण

येरवडा पोलिसांकडून काही तासातच तरुणाची सुटका, पाच जणांना अटक

सकाळ वृत्तसेवा

पुणे : महिलेसमवेतच्या प्रेमसंबंधातून आत्महत्या केल्या संशयातुन आत्महत्या (Suicide) करणाऱ्याच्या भावाने त्याच्या साथीदाराच्या मदतीने महिलेच्या 20 वर्षीय मुलाचे शनिवारी रात्री कल्याणीनगर येथून अपहरण केले. दरम्यान, हा प्रकार येरवडा पोलिसांना समजल्यानंतर काही तासातच पोलिसांनी आरोपींचा माग काढून तरुणाची पेरणे फाटा येथून सुटका केली, तसेच पाच जणांना बेड्या ठोकल्या. न्यायालयाने संशयित आरोपींना 18 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. (Pune Crime News)

विजय राम गेचंद (वय 31), अजय रानबा हावळे (वय 21), विकास आनंद भंडारी (वय 30), जमीर करीम शेख (वय 19) व सुरज गंगाराम मौर्य (वय 26, सर्व रा. राजीव गांधीनगर, येरवडा) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी 38 वर्षीय महिलेने येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. फिर्यादी महिलेचे आरोपी विजय गेचंद याचा भाऊ सनी गेचंद याच्यासमवेत प्रेमसंबंध होते.

दरम्यान, सनीने काही दिवसांपुर्वी आत्महत्या केली होती. आपल्या भावाने संबंधित महिलेमुळेच आत्महत्या केली, असा विजय गेचंद याला संशय होता. त्यातुनच त्याने भावाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी इतर चार साथीदारांसमवेत फिर्यादीच्या मुलाचे अपहरण करण्याचा कट रचला. त्यानुसार, संबंधित तरुणाचे तो कामाला असलेल्या कल्याणीनगर येथील ठिकाणावरून शनिवारी रात्री साडे अकवा वाजता अपहरण केले.

मुलगा बराच वेळ घरी न आल्याने आईने पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली. त्यानंतर घटनेचे गांभीर्य ओळघून अपर पोलिस आयुक्त नामदेव चव्हाण, परिमंडळ चारचे पोलिस उपायुक्त रोहिदास पवार, सहाय्यक पोलिस आयुक्त किशोर जाधव, पोलिस निरीक्षक (गुन्हे) विजयसिंग चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तीन पथके तयार करुन तपासासाठी पाठविण्यात आली. त्यानुसार, एका पथकास अपहरण केलेल्या तरुणाला लोणीकंद पोलिस ठाण्याच्या हद्दीत नेल्याची खबर मिळाली. त्यानुसार, पथकाने पेरणे फाटा येथे अपहरणकर्त्यांच्या कारला गाठले. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या तावडीतुन तरुणाची सुटका केली. त्यानंतर पाच आरोपींना अटक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Main Exam 2026 Postponed : MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! 3 ऑक्टोबरपासून होणाऱ्या तीन महत्त्वाच्या मुख्य परीक्षा ढकलल्या पुढे; आयोग लवकरच जाहीर करणार नव्या तारखा

Jammu-Kashmir Assembly: जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा? विधानसभेत ठराव मंजूर, भाजपचा सभात्याग! काय बदल होणार?

Ladki Bahin Yojana ₹1500 Installment : लाडक्या बहिणींच्या खात्यात 3000 ऐवजी किती पैसे जमा झाले? घरबसल्या मोबाईलवर मिनिटांत तपासा रक्कम; कशी पाहाल स्टेटस?

Latest Marathi News Live Update: ९० कोटींच्या निविदेसाठी आयुक्तांना धमकी

Udaipur ₹2 Crore Bribery Case : एसीबीच्या जाळ्यात सापडला मोठा मासा? तब्बल 2 कोटी रुपयांची घेतली लाच; एसओजी अधिकाऱ्याच्या नावाने पैसे घेणारा दलाल जाळ्यात

SCROLL FOR NEXT