बेड्या
बेड्या sakal
पुणे

उच्चभ्रु महिलांशी 'फ्रेंडशीप' करण्याच्या बहाण्याने लुटणाऱ्याला बेड्या

सकाळ वृत्तसेवा

पुणे : "फ्रेंडशीप क्‍लब'च्या माध्यमातून उच्चभ्रु महिलांशी मैत्रीचे आमिष दाखवून नागरीकांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीस सायबर पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या. संबंधित आरोपीकडून नागरीकांची फसवणुक करण्यासाठी काही महिलांच्या बॅंका खात्याचा वापर केला जात होता. मागील 3 ते 4 वर्षांपासून आरोपीकडून हा प्रकार सुरू असून त्याने अनेकांना फ्रेंडशीपच्या बहाण्याने गंडा घातल्याची शक्‍यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. (Pune Crime News)

अनुप सुकलाल मनोरे (वय 35, रा. न्याती ईवारा, कोरिएंथन क्‍लबजवळ, महम्मदवाडी) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. याच प्रकरणात सायबर पोलिसांनी यापुर्वी दिपाली कैलास शिंदे (वय 28, रा. नेताजीनगर, वानवडी) या महिलेस अटक केली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उच्चभ्रु महिलांशी मैत्री करण्याबाबत उल्लेख असलेली "फ्रेंडशिप क्‍लब' या नावाची जाहिरात पाहून एका व्यावसायिक ज्येष्ठ नागरीकाने संबंधित मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला. त्यावेळी संबंधित महिलेने वेगवेगळी कारणे सांगून ज्येष्ठ नागरीकाकडून तब्बल 60 लाख 20 हजार रुपयांची रक्कम घेऊन त्यांची फसवणूक केली होती. सायबर पोलिसांनी या प्रकरणी दाखल तक्रारीची दखल घेऊन शिंदे हिला काही दिवसांपुर्वी अटक केली होती.

दरम्यान, पोलिसांकडून या प्रकरणातील मुख्य आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यावेळी संबंधित महिलेकडून सातत्याने वापरण्यात येणाऱ्या एका मोबाईल क्रमांकाची माहिती प्राप्त करुन अन्य तांत्रिक विश्‍लेषण करण्यात आले. त्यावेळी संबंधीत मोबाईल क्रमांक हा या प्रकरणातील मुख्य आरोपीचा असल्याचे तसेच तो महम्मदवाडी येथे वास्तव्यास असल्याची माहिती पुढे आली. त्यानुसार, सायबर पोलिसांच्या पथकाने महम्मदवाडी येथून मनोरे यास अटक केली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक डि.एस.हाके, पोलिस निरीक्षक संगीता माळी, पोलिस उपनिरीक्षक सागर पडवळ, पोलिस हवालदार अस्लम आत्तार, राहूल हंडाळ, अंकीता राघो, शिरीष गावडे यांच्या पथकाने हि कारवाई केली.

असा सुरू होता फसवणुकीचा प्रकार

मनोरे हा विविध ठिकाणच्या महिलांशी संपर्क साधत होता. त्यानंतर संबंधित महिलांना तो त्यांच्या नावाने बॅंकेमध्ये खाते उघडण्यास सांगत होता. तसेच संबंधित महिलांच्याच कागदपत्रांचा वापर करुन त्याद्वारे मोबाईलसाठी सीमकार्ड घेत होता. त्याचा वापर करून तो नागरीकांची फसवणुक करीत असल्याचे तपासात उघड झाले आहे. मनोरे हा स्वतःचा मोबाईल व बॅंक खात्याचा वापर या गुन्ह्यासाठी करीत नव्हता. त्याचबरोबर गणेश शेलार या बनावट नावाचा वापर करुन तो पोलिसांच्या तावडीत सापडू नये, यासाठी प्रयत्न करीत होता. मनोरे हा कथा लिहीण्याचे काम करतो, असे पोलिस निरीक्षक संगीता माळी यांनी सांगितले.

"नागरीकांची फ्रेंडशिप क्‍लबच्या नावाखाली काही जणांकडून फसवणुक सुरु होती. त्याची दखल घेऊन आरोपींना अटक केली आहे. तरीही नागरीकांनी फ्रेंडशीप क्‍लब सारख्या प्रकारांना बळी पडू नये. स्वतः सतर्कता बाळगावी आणि अशा पद्धतीने फसवणूक झाल्यास तत्काळ सायबर पोलिसांशी संपर्क साधावा.''

-डी.एस.हाके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सायबर पोलिस ठाणे.

इथे साधा संपर्क -

* सायबर पोलिस ठाणे - 020-29710097

* ई-मेल - crimecyber.pune@nic.in

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT