Khadakwasala Dam Sakal
पुणे

Khadakwasala Dam Water : खडकवासला धरणसाखळीतील पाणीसाठा गतवर्षीपेक्षा साडेचार टीएमसीने कमी

खडकवासला धरण साखळीतील चारही धरणात मिळून मागील वर्षी २०.१७ टीएमसी म्हणजे ६९.१९ टक्के पाणीसाठा जमा झाला.

सकाळ वृत्तसेवा

खडकवासला - खडकवासला धरण साखळीतील चारही धरणात मिळून मागील वर्षी २०.१७ टीएमसी म्हणजे ६९.१९ टक्के पाणीसाठा जमा झाला होता. रविवारी (ता. २३) संध्याकाळी पाच वाजेपर्यंत धरण साखळी १५.६२ टीएमसी म्हणजे ५३.६० टक्के पाणीसाठा जमा झाला होता. म्हणजे मागील वर्षीपेक्षा साडेचार टीएमसी पाणी कमी जमा झाले आहे.

रविवारी सकाळी सहा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत पावसाचा जोर शनिवारपेक्षा थोडा वाढलेले होता. खडकवासला येथे तीन, पानशेतला २१, वरसगावमध्ये २२, तर टेमघरला ३० मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

खडकवासला धरण साखळीत शनिवारी सकाळी सहा वाजता १४.११ टीएमसी पाणीसाठा जमा झाला होता. रविवारी चारही धरणात मिळून १५.१६ टीएमसी पाणीसाठा जमा झालेले आहे. अशाप्रकारे धरणात २४ तासांत एक टीएमसी पाणीसाठा वाढला आहे.

सध्याचा पाऊस व पाणीसाठ्याची स्थिती थोडी समाधानकारक होत आहे. पाणीसाठ्याचा स्थितीचा अहवाल कालवा सल्लागार समितीकडे सादर करणार आहे. समितीच्या मार्गदर्शन सूचनेनुसार पुढील निर्णय घेतले जातील.

- श्वेता कुऱ्हाडे, कार्यकारी अभियंता, खडकवासला पाटबंधारे विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Omraje Nimbalkar यांची समजूत काढण्याचा प्रयत्न! ऑपरेशन टायगर फेल करण्यासाठी उद्धव ठाकरेंची रात्रीत एक मोठी चाल

Bulandshahr Kachori : चव अशी की विसरणार नाही! सकाळच्या नाश्त्यातली ही कचोरी आता पोहोचली परदेशात; बुलंदशहरची भन्नाट कहाणी

Pune Railway: पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! तीन विशेष रेल्वे गाड्या नियमित; तिकीट दर होणार निम्मे, नेमकं कस आहे वेळाकपत्रक..

आजचे राशिभविष्य - 21 जून 2026

IND A vs SL A: त्याच्यासाठी चॅलेंज असणारच... वैभव सूर्यवंशीच्या फॉर्मवर फायनल सामन्यापूर्वी तिलक वर्मा नेमकं काय म्हणाला?

SCROLL FOR NEXT