Dapodi sakal
पुणे

Pune : दापोडीतील गायकवाड कुटुंबीयांना पालिकेने आर्थिक मदत व मनपात नोकरी देण्याची होतेय मागणी

अपघाती निधन व त्यानंतर मृतदेहाची अदलाबदल

सकाळ वृत्तसेवा

जुनी सांगवी : दापोडी येथील स्नेहलता गायकवाड यांच्या मृतदेह अदला बदलीच्या प्रकारामुळे गायकवाड कुटुंबियांना त्यांचे अंतिम दर्शन घेवून अंत्यसंस्कारही करता आले नाहीत. आधी अपघाती निधन व त्यानंतर मृतदेहाची अदलाबदल या प्रकारामुळे गायकवाड कुटूंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला.

सतत हसमुख व मनमिळाऊ स्वभाव अशी स्नेहलता गायकवाड यांची दापोडीत ओळख होती. या प्रकारामुळे दापोडीकरांवर शोककळा पसरली आहे.महापालिकेने दोषींवर कायदेशीर कारवाई करावी याचबरोबर गायकवाड कुटुंबियांना आर्थिक मदत व महापालिकेच्या सेवेत नोकरी देण्याची मागणी दापोडीकरांकडून होत आहे.

याबाबत निवेदनाद्वारे येथील भाजपा सचिव विशाल वाळूंजकर यांनी मनपा आयुक्त यांच्याकडे मागणी केली आहे.निवेदनात म्हटले आहे की,दापोडी येथील आत्तारविट येथील स्नेहलता अशोक गायकवाड यांच्याबाबत घडलेल्या घटनेमुळे दापोडीतील गायकवाड कुटुंबीयांना मानसिक त्रास व धक्का बसला असून, त्यांचे न भरून येणारे नुकसान झालेले आहे.

मृतदेह अंत्यसंस्कारासाठी न मिळणे ही सदैव मानसिक त्रास देणारी घटना आहे. झालेल्या घटनेची चौकशी करून दोषी डॉक्टर ,अधिकारी , कर्मचारी यांच्यावर कारवाई करून निलंबित करण्यात यावे व गायकवाड यांच्या कुटुंबांना आर्थिक मदत व कुटुंबातील एका सदस्याला मनपा शासकीय सेवेत नोकरी देण्यात यावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hockey World Cup: पेनल्टी कॉर्नर ठरले भारताचे अस्त्र! स्वातंत्र्यदिनी वेल्सला हरवत विजयी सुरुवात

Crime: एका संशयाने नात्याला काळिमा! सासू आणि पत्नीच्या वादातून संताप अनावर; जावयाने उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?

Marathi News Live Updates : स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला भोर तालुक्यात होणारा संभाव्य अनर्थ भोर पोलिसांनी टाळला

IND vs SL: देवदत्त पडिक्कलचे स्वातंत्र्यदिनी ऐतिहासिक शतक, ८० वर्षात कोणालाही न जमलेला केला पराक्रम! पहिल्या दिवशी भारताचे वर्चस्व

Skincare Tips: चेहऱ्यासाठी प्रत्येक वेळी घरगुती उपाय नसतात फायदेशीर! जाणून घ्या त्वचातज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला...

SCROLL FOR NEXT