memu local Sakal
पुणे

‘पुणे-दौंड मार्गावरील रेल्वे तिकीटदर कमी करा’

कोरोनामुळे बंद केलेली पुणे- दौंड-बारामती, पुणे-कोल्हापूर लोकलसेवा ११ एप्रिलपासून सुरू झाली.

प्रशांत पाटील

कोरोनामुळे बंद केलेली पुणे- दौंड-बारामती, पुणे-कोल्हापूर लोकलसेवा ११ एप्रिलपासून सुरू झाली.

पुणे - दौंड ते पुणे (Daund to Pune) या मार्गावर सकाळी धावणाऱ्या रेल्वे (Railway) गाडीला मेमू लोकलचा (Memu Local) दर्जा आहे, तर हीच गाडी ज्यावेळी दुपारी तीन वाजता पुण्यातून दौंडला रवाना होते, त्यावेळी या गाडीला मेल एक्स्प्रेसचा (Mail Express) दर्जा दिला आहे. त्यामुळे सकाळी या मार्गावर प्रवास करतेवेळी २० रुपये, तर दुपारी तीन वाजता पुन्हा याच मार्गावर परतीचा प्रवास करताना ४५ रुपये तिकिटासाठी (Ticket) मोजावे लागतात. त्यामुळे या गाडीला मेमू लोकलचा दर्जा द्यावा. तसेच, तिकीट दर लोकल प्रमाणे लागू करावेत, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.

कोरोनामुळे बंद केलेली पुणे- दौंड-बारामती, पुणे-कोल्हापूर लोकलसेवा ११ एप्रिलपासून सुरू झाली. कोरोनामुळे दोन वर्षे लॉकडाउन काळात लोकलसेवा बंद केली होती. रेल्वेच्या दर्जात भेद असल्यामुळे सामान्य प्रवाशांना विनाकारण तिकिटांचा जादा भुर्दंड सहन करावा लागत आहे. या मागे नेमके कारण काय? हे समजत नाही.

- विकास देशपांडे, सचिव, दौंड-पुणे-दौंड प्रवासी संघ

रेल्वे मंत्रालय आणि मुख्यालयाच्या वरिष्ठ स्तरावर असे निर्णय घेतलेले असतात. ठरलेल्या धोरणानुसार विभागीय कार्यालय त्याची अंमलबजावणी करते. त्यानुसार रेल्वेगाडीला दर्जा देण्यात आला आहे.

- मनोज झंवर, जनसंपर्क अधिकारी, रेल्वे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT