fraud Crime News esakal
पुणे

सीरम इन्स्टिट्युट'ची तब्बल 1 कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्यांना अखेर अटक

'सीरम इन्स्टिट्यूट'चे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला यांच्या नावाने बनावट व्हॉटसऍप मेसेज पाठवून इन्स्टिट्यूट या संस्थेची तब्बल एक कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्यांना अखेर पोलिसांनी अटक केली.

सकाळ वृत्तसेवा

'सीरम इन्स्टिट्यूट'चे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला यांच्या नावाने बनावट व्हॉटसऍप मेसेज पाठवून इन्स्टिट्यूट या संस्थेची तब्बल एक कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्यांना अखेर पोलिसांनी अटक केली.

पुणे - 'सीरम इन्स्टिट्यूट'चे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला यांच्या नावाने बनावट व्हॉटसऍप मेसेज पाठवून इन्स्टिट्यूट या संस्थेची तब्बल एक कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्यांना अखेर पोलिसांनी अटक केली. बंडगार्डन पोलिसांच्या पथकाने बिहार येथे जाऊन हि कारवाई केली. मात्र या प्रकरणातील मुख्य सुत्रधार अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. फसवणुकीची घटना 7 सप्टेंबर रोजी घडली होती.

रविंद्र कुमार हुबनाथ पटेल (वय 34, रा. उत्तरप्रदेश), राजीवकुमार शिवजी प्रसाद (वय 27), चंद्रभुषण आनंद सिंग (वय 37), कन्हैया कुमार संभू म्हानतो (वय 22, रा.तिघेही बिहार) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, "सीरम इन्स्टिट्यूट'चे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला यांच्या नावाने बनावट व्हॉटसऍप मेसेज पाठवून इन्स्टिट्यूट या संस्थेची तब्बल एक कोटी रुपयांची फसवणूक केल्याची घटना 7 सप्टेंबर रोजी घडली होती.याप्रकरणी "सीरम इन्स्टिट्यूट'चे फायनान्स अधिकारी सागर कित्तूर (वय 44, रा. कोंढवा) यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.

त्यानुसार माहिती व तंत्रज्ञान कायद्यानुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कित्तूर हे सीरम इन्स्टिट्यूटमध्ये फायनान्स व्यवस्थापक आहेत्न, तर सतीश देशपांडे हे कंपनीचे संचालक आहेत. आदर पूनावाला हे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. पूनावाला यांच्या नंबरवरून बनावट व्हॉटसऍप मेसेज देशपांडे यांना आला होता. त्यात काही बॅंक खात्यांचे नंबर देऊन त्यावर तत्काळ पैसे पाठविण्यास सांगितले. हे मेसेज खरे वाटल्याने कंपनीच्या खात्यावरून विविध बॅंक खात्यांवर तब्बल 1 कोटी 1 लाख 1 हजार 554 रुपये पाठविण्यात आले.

मात्र, संबंधित प्रकाराद्वारे फसवणुक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर कंपनीकडून पोलिसांकडे फिर्याद देण्यात आली. या प्रकरणाचा तपास बंडगार्डन पोलिसांकडून सुरु होता. त्यादृष्टीने पोलिसांनी तांत्रिक तपास केला, त्यावेळी बिहार येथील आरोपींनी हा गुन्हा केल्याचे उघडकीस आले. त्यानुसार, पोलिसांच्या पथकाने त्यांना बिहारमध्ये जाऊन अटक केली. फसवणूक करुन मिळविलेले पैसे चार जणांनी त्यांच्या बॅंक खात्यावर मुल्यवर्धीत कराचे पैसे आल्याचे सांगून घेतल्याचे पोलिसांनी केलेल्या तपासात निष्पन्न झाले आहे.वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रताप मानकर, पोलिस निरीक्षक (गुन्हे) अश्निनी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने हि कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 MI vs SRH : ...अन् डोळ्यात पाणी आलं! वानखेडेवर Vinod Kambli ची ती अवस्था पाहून चाहते हळहळले; हृदयस्पर्शी Video Viral

अग्रलेख : संयुक्त अरब जागृती!

१२ जूनपासून नवे शैक्षणिक वर्ष! विद्यापीठाने ५ दिवसांत लावले १७ अभ्यासक्रमांचे निकाल; उत्तरपत्रिकेच्या फोटोकॉपीसाठी ७०० ते ८०० रुपये शुल्क, वाचा...

Panchang 30 April 2026 : आजचे पंचांग! नृसिंह जयंती, शुभ मुहूर्त आणि राहु काळ जाणून घ्या

Arjun Tendulkar: सचिन तेंडुलकरच्या लेकावर पुन्हा लागणार बोली; बेस प्राईज ५ लाख, BCCI ची परवानगी, LSG ने एकही मॅच नाही खेळवली

SCROLL FOR NEXT