pune zp sakal
पुणे

Pune : विद्यार्थ्यांना दाखले मुदतीत देण्याची जिल्हा प्रशासनाने केली तयारी

जिल्हा प्रशासन सज्ज : ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ तत्त्वाचा अवलंब

सकाळ वृत्तसेवा

पुणे : दहावी आणि बारावीच्या निकालांनतर विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी लागणारे विविध दाखले मुदतीत वितरित करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तयारी केली आहे. यातील वशिलेबाजी रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने नव्या संगणक प्रणालीचा वापर सुरु केला आहे. त्यानुसार ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ (फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह) या तत्त्वावर दाखले दिले जातील. त्यामुळे अर्ज ज्या क्रमाने आले त्याच क्रमाने ऑनलाइन दाखले दिले जातील.

पुणे शहर तहसिल कार्यालयाच्या अखत्यारीत सुमारे ५२ महा ई सेवा केंद्रे आहेत. सीबीएसई आणि आयसीएसईसह महाराष्ट्र बोर्डाचेही दहावी-बारावीचे निकाल जाहीर झाले आहेत. प्रवेशप्रक्रियेसाठी लागणाऱ्या दाखल्यांसाठी नागरिकांची गर्दी होते. एकाच वेळी असंख्य अर्ज येत असल्याने प्रशासनाला दाखले देण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते.

यातून नागरिक आणि शासकीय कर्मचाऱ्यांत वादावादी होते. अर्ज करताना नागरिकांना बराच वेळ रांगेत उभे राहावे लागते. अर्जात त्रुटी असल्यास हेलपाटे मारावे लागतात. प्रवेशप्रक्रियेच्या कालावधीत दाखला मिळाला नाही तर विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याचा धोका असतो. विद्यार्थ्यांना दाखल्यांसाठी नागरी सुविधा केंद्रांत हेलपाटे मारावे लागू नयेत म्हणून ऑनलाइन दाखले दिले जातात.

प्रवेशासाठी उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, नॉन क्रिमिलेयर, जातीचा दाखला आदी ऑनलाइन देण्यास प्रशासनाचे प्राधान्य आहे. त्यासाठी सेतू केंद्रात न जाता विद्यार्थ्यांना घराजवळील महा ई सेवा केंद्रात अर्ज करता येणार आहे. तसेच ‘आपले सरकार'' पोर्टलवरून अर्ज करावेत, असे आवाहन प्रशासनाने केले.

उत्पन्नाचा दाखला

अर्ज, स्वघोषणापत्र, फोटो, आधारकार्ड, पत्त्याच्या पुराव्यासाठी विजेचे बिल, करपावती, रेशनकार्ड यापैकी एक, फॉर्म १६ किंवा तलाठ्याकडील उत्पन्नाचा दाखला.

वय-राष्ट्रीयत्व अधिवास दाखला

स्वघोषणापत्र, आधारकार्ड, फोटो, विद्यार्थ्याचा शाळा सोडल्याचा दाखला, तसेच वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म दाखला, महाराष्ट्रातील सलग १५ वर्षे वर्षाचे रहिवास पुराव्यासाठी रेशनकार्ड विजेचे बिल अथवा महापालिकेची करपावती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI Action On Banks: आरबीआयने मुंबईतील ५२ वर्षे जुन्या बँकेचा परवाना केला रद्द ; तुमचंही खातं आहे? ग्राहकांच्या पैशांचं काय होणार?

Pune News : पंतप्रधानांच्या आवाहनानंतरही अधिकाऱ्‍यांचा परदेश दौरा

Pune Businessman Death : पुणे हादरलं! प्रसिद्ध उद्योजकाचा हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू; आर्थिक विवंचनेतून टोकाचं पाऊल? मृतदेहाजवळ सापडली चिठ्ठी

Latest Marathi News Update : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर...

GT vs SRH Live : साई सुदर्शनने इतिहास रचला! गुजरातचा डोलारा सांभाळला; हैदराबादविरुद्ध विक्रमी खेळी अन् आव्हानात्मक लक्ष्य

SCROLL FOR NEXT