Form Submission Sakal
पुणे

अजित पवार यांचा पुणे जिल्हा बँकेसाठी उमेदवारी अर्ज

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदासाठी बारामती तालुका प्रतिनिधी 'अ' वर्ग मतदारसंघातून आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

मिलिंद संगई,

बारामती - उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदासाठी बारामती तालुका प्रतिनिधी 'अ' वर्ग मतदारसंघातून आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

पुण्यातील बँकेच्या निवडणूक कार्यालयात आज अजित पवार यांच्या वतीने दोन अर्ज दाखल करण्यात आले. पहिल्या उमेदवारी अर्जावर सूचक म्हणून सतीश हरिभाऊ तावरे, अनुमोदक म्हणून दिपक मलगुंडे दुस-या उमेदवारी अर्जावर अमोल गावडे यांनी सूचक तर लालासाहेब नलवडे यांनी अनुमोदक म्हणून स्वाक्षरी केली आहे. या वेळी ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, उपनगराध्यक्ष अभिजित जाधव, नगरसेवक सुधीर पानसरे आदी उपस्थित होते.

या मतदारसंघात 195 मतदार आहेत. अजित पवार यांचे बँकेवर निर्विवाद वर्चस्व असून संचालक मंडळही त्यांच्याच संमतीने ठरणार हे उघड आहे. सन 1991 पासून अजित पवार पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर संचालक म्हणून निवडून गेलेले असून सात वेळा ते या बँकेचे अध्यक्ष होते. राजकारणाचा प्रारंभ या बँकेच्या संचालकपदापासूनच झालेला असल्याने या बँकेशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाचीही धुरा त्यांनी सांभाळली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT