पुणे

पुणे जिल्हा बँकेचे पाचशे कोटींचे बाँड उद्दिष्ट

CD

पुणे, ता. १२ : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने लाँग टर्म सबऑर्डिनेट बाँड (एलटीएसबी)च्या विक्रीतून निर्धारित ५०० कोटी रुपयांचे विक्रमी उद्दिष्ट पूर्ण केले आहे. राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या इतिहासात इतक्या अल्प कालावधीत एवढे मोठे बाँड विक्रीचे उद्दिष्ट पूर्ण करणारी पुणे जिल्हा बँक एकमेव असल्याचे बँकेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे यांनी सांगितले.
रिझर्व्ह बँकेच्या परवानगीनुसार तसेच पुणे जिल्ह्यातील नागरी व ग्रामीण बिगरशेती पतसंस्थांना वैधानिक तरलता प्रमाणासाठी (एसएलआर) करण्याच्या गुंतवणुकीपैकी पाच टक्के गुंतवणूक बँकेच्या बाँडमध्ये करण्यास राज्य शासनाने परवानगी दिली आहे. या पार्श्‍वभूमीवर बँकेने एलटीएसबी बाँडची विक्री केली. या बाँडमध्ये किमान १० हजार रुपयांची गुंतवणूक करता येते. तसेच १० वर्षांच्या कालावधीसाठी ८.५० टक्के व्याजदर असून, व्याजाची रक्कम दर तीन महिन्यांनी खात्यावर जमा केली जाते. आकर्षक व्याजदर, गुंतवणुकीची रचना आणि बँकेवरील विश्‍वास यामुळे बाँडला प्रतिसाद मिळाल्याचे दुर्गाडे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नव्या मतदार नोंदणीसाठी महत्त्वाची बातमी! आता नोंदणीवेळी जुळवावी लागणार २४ वर्षांपूर्वीची वंशावळ; प्रशासनाला शोध सोलापुरातील ६ लाख मतदारांचा, वाचा...

Riddhi Thakkar: ‘लेट्स एक्सप्लोर बस्तर...’ २० बाइकरचा ग्रुप, सफरीचं स्वप्न ठरलं अखेरचं, अचानक काळाचा घाला; मुंबईच्या रिद्धीचा दुर्दैवी अंत

Khutbav Accident : नियतीचा खेळ, मृत्यूतही साधला मेळ; रक्षाबंधनापूर्वी बहीण-भावावर काळाचा घाला, पारगावात हळहळ

Talegaon Dabhade News : रस्ता नसल्याने ज्येष्ठाला उपचारासाठी झोळीतून नेण्याची वेळ

मोठी बातमी! मराठा समाजातील १.८१ लाख तरुण रोजगार मागणारे नव्हे रोजगार देणारे; ७ वर्षांत अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडून १८७४ कोटी

SCROLL FOR NEXT