Pune Corona Update  sakal
पुणे

पुणे जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती सामान्य; दिवसभरात ७८२ नवे कोरोना रुग्ण

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे जिल्ह्यात रविवारी (ता.१३) दिवसभरात ७८२ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. याउलट दिवसात २ हजार ९९८ जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात अन्य दोन‌ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात रविवारी सलग दुसऱ्या दिवशी कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा आकडा एक अंकी झाला आहे. आठवडाभरानंतर शनिवारी (ता.१२) पहिल्यांदा दिवसातील मृत्यूची संख्या एक अंकी झाली होती.

जिल्ह्यातील दिवसातील दोन्ही मृत्यू हे फक्त पुणे शहरातील आहेत. रविवारी दिवसभरात पिंपरी चिंचवड, जिल्हा परिषद कार्यक्षेत्र, नगरपालिका आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात एकाही कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला नाही. जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने रोज कोरोना आकडेवारीचा अहवाल प्रसिद्ध केला जातो. या अहवालातून हे उघड झाले आहे.

जिल्ह्यातील दिवसातील एकूण नवीन रुग्णांमध्ये पुणे शहरातील ४२४ रुग्ण आहेत. दिवसात पिंपरी चिंचवडमध्ये १८५, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात ११९, नगरपालिका हद्दीत ३६ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात १८ नवे रुग्ण आढळून आले आहेत. दिवसभरातील एकूण कोरोनामुक्तांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक १ हजार ३७७ जण आहेत. पिंपरी चिंचवडमधील ७१८, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील ७५६, नगरपालिका हद्दीतील ८० आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील ६७ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Voter List Revision : कोल्हापूर जिल्ह्यातील साडेचार लाख मतदार वगळणार; 'एसआयआर'चे 99.91 टक्के काम पूर्ण, पाहा विधानसभा मतदारसंघनिहाय चित्र

World Record Tiranga Rally: डोंबिवलीत तिरंग्याचा विश्वविक्रमी डौल, ३५ हजार चौरस फुटांच्या ध्वजासह भव्य रॅली

Palkhed Dam Tricolour Lighting: तिरंग्याच्या रंगात न्हाले धरणः स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून मनमोहक तिरंगी विद्युत रोषणाई

Marathi News Live Updates : भोर तालुक्यातील खड्ड्यांमध्ये भात लावून विद्यार्थ्यांनी वेधले प्रशासनाचे लक्ष

Kamalakar Chaskar Police Medal: चास गावच्या सुपूत्राला केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाकडून उल्लेखनीय कामगिरीबद्दल 15 ऑगस्ट रोजी अति उत्कृष्ट सेवा पदक जाहीर

SCROLL FOR NEXT