Pune district team departs for Solapur for sports Competition
Pune district team departs for Solapur for sports Competition 
पुणे

पुणे जिल्ह्याचा संघ स्पर्थेसाठी सोलापूरला रवाना

सकाळ वृत्तसेवा

पुणे : सोलापूर येथे 21 ते 23 फेब्रुवारीदरम्यान होणाऱ्या विभागीय महसूल क्रीडा स्पर्धेसाठी पुणे जिल्ह्याचा संघ गुरुवारी सोलापूरला रवाना झाला. या संघात सुमारे दोनशे अधिकारी आणि कर्मचारी खेळाडूंचा समावेश आहे.

 - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जिल्हाधिकारी नवल किशोर राम आणि निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांनी पुणे जिल्ह्याच्या संघाला शुभेच्छा दिल्या. उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, भानुदास गायकवाड, श्रीमंत पाटोळे, रेश्‍मा माळी तसेच तहसीलदार आणि महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी या वेळी उपस्थित होते.

फाशीपासून वाचण्यासाठी निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषीची नवी चाल

या स्पर्धेत जिल्ह्यातील महसूल विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी विविध क्रीडा प्रकारात सहभागी होत आहेत. क्रीडा स्पर्धेत सांघिक व वैयक्तिक असे प्रकार आहेत. इनडोअर आणि आउटडोअर अशा स्पर्धा होणार आहेत. सांघिक क्रीडा प्रकारांमध्ये क्रिकेट, फुटबॉल, खो-खो, कबड्डी, हॉलीबॉल, थ्रो बॉल, रिंग टेनिस इत्यादी क्रीडा प्रकार आहेत. तर, मैदानी क्रीडा स्पर्धेमध्ये धावणे, थाळीफेक, गोळाफेक, भालाफेक, लांब उडी, उंच उडी क्रीडाप्रकार पुरुष गट व महिला गट या दोन गटांमध्ये खेळले जाणार आहेत. टेबल टेनिस, बॅडमिंटन, कॅरम, बुद्धिबळ क्रीडा प्रकार महिला व पुरुष गटांमध्ये दोन वयोगटात खेळले जाणार आहेत. 

पुणे विभागीय महसूल क्रीडा स्पर्धेत पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या पाच जिल्ह्यांचा समावेश आहे. प्रत्येक जिल्ह्यातील जवळपास दोनशे ते अडीचशे खेळाडूंचा संघ स्पर्धेत सहभागी होतो. यामधून एका जिल्ह्याला जनरल चॅम्पियनशिप त्यानंतर द्वितीय क्रमांक व तृतीय क्रमांक असे क्रमांक दरवर्षी दिले जातात. या स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंची निवड राज्यस्तरीय महसूल क्रीडा स्पर्धेसाठी केली जाते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT