पुणे

परवानगीशिवाय ड्रोन उडविल्यास जप्ती

CD

पुणे, ता. १५ : गणेशोत्सवाच्या काळात परवानगीशिवाय ड्रोन उडवून चित्रीकरण करणाऱ्यांवर पुणे पोलिसांकडून आता थेट जप्तीची कारवाई केली जाणार आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी मध्यवर्ती पुण्यातील गर्दीच्या भागांत अनेक ठिकाणी अनधिकृतपणे ड्रोनद्वारे चित्रीकरण झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे.

गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी शहराच्या विविध भागांत गणेशमूर्तींच्या आगमन मिरवणुका, तसेच प्रतिष्ठापना सोहळ्यांसाठी मोठी गर्दी झाली होती. या गर्दीचा फायदा घेत काही व्लॉगर, फोटोग्राफर आणि ड्रोन ऑपरेटरकडून ड्रोन उडवून चित्रीकरण करण्यात येत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. विशेषतः मध्यवर्ती भागातील गर्दीच्या ठिकाणी अनेक ड्रोन आकाशात घिरट्या घालत असल्याचे आढळून आले.

गणेशोत्सवातील गर्दीचे व्यवस्थापन, महत्त्वाच्या ठिकाणांची सुरक्षा आणि ड्रोनमुळे निर्माण होणारा संभाव्य धोका लक्षात घेता पोलिसांनी याची गंभीर दखल घेतली आहे. विनापरवाना ड्रोनच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी ‘अँटी ड्रोन पथक’ स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. हे पथक गर्दीच्या, तसेच संवेदनशील ठिकाणी संशयास्पद ड्रोनच्या हालचालींवर लक्ष ठेवणार आहे.

व्लॉगर, फोटोग्राफरना कारवाईला सामोरे जावे लागणार :
ड्रोन उडविण्यासाठी आवश्यक परवानगी न घेता चित्रीकरण करणाऱ्या ऑपरेटरवर कायदेशीर कारवाई केली जाईल. तसेच, ड्रोनही जप्त केले जाणार आहेत. त्यामुळे केवळ सोशल मीडिया रिल्स, यूट्यूब व्हिडिओ किंवा गणेशोत्सवाचे चित्रीकरण करण्यासाठी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्लॉगर आणि फोटोग्राफरना कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.


सुरक्षेला धोका निर्माण होण्याची शक्यता :
गर्दीच्या ठिकाणी ड्रोन उडविल्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेबरोबरच पोलिसांच्या बंदोबस्तात अडथळा निर्माण होऊ शकतो. तसेच संवेदनशील ठिकाणांचे चित्रीकरण होण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी ड्रोन ऑपरेटर, व्लॉगर, फोटोग्राफर आणि इतर नागरिकांनी नियमांचे पालन करून आवश्यक परवानगी घेतल्यानंतरच ड्रोन उडवावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT