पोलीस निरीक्षक मुजावर sakal
पुणे

निवडणूकीत नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई : पोलीस निरीक्षक मुजावर

शहा सांस्कृतिक भवन मध्ये तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले होते.

डॉ. संदेश शहा

इंदापूर : इंदापूर तालुक्यात आगामी काळात विविध निवडणूका होणार असून निवडणूकीत नियम भंग करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल असा सूचक इशारा इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक टी.वाय.मुजावर यांनी दिला.

इंदापूर पोलीस ठाण्याअंतर्गत दि. ९ डिसेंबर रोजी येथील शहा सांस्कृतिक भवन मध्ये तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी इंदापूर पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी, बिट अंमलदार, पोलीस पाटील, महिला दक्षता कमिटीच्या सदस्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी तक्रारदारांच्या सूचना निवारण करण्यासाठी सर्वांनी योग्य काळजी घ्यावी अश्या सूचना त्यांनी दिल्या.

श्री. मुजावर पुढे म्हणाले,इंदापूर तालुक्यात सध्या पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकनिवडणूकीची रणधुमाळी सुरू असून आगामी काळात नगर परिषद, पंचायत समिती व जिल्हा परिषद या निवडणूका होणार आहेत. निवडणूक कालावधीत गुन्हे करणाऱ्यांची गय केली जाणार नाही.

यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर धनवे यांनी गावागावांतील बँक, सराफकट्टा यांची सुरक्षा, महिला व शिक्षण घेणाऱ्या मुली विषयी होणारे अपराध व त्याविषयी घ्यावयाची दक्षता तर सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील यांनी गावागावात शांतता व सलोखा, कोरोना महामारीचे निर्बंध यासंदर्भात मार्गदर्शन केले. सुत्रसंचलन पवन भोईटे यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Social Media Election Rules : निवडणूक प्रचारात डीपफेक व्हिडिओ वापराल तर कारवाई; आयोगाचे राजकीय पक्षांना कडक निर्देश

'मी जे केलं ते तुम्ही करू नका...' सिंगल मदरहुडबद्दल नीना गुप्तांचं स्पष्ट वक्तव्य, म्हणाल्या...

Chanakya Niti: नशीब बदलत नाही म्हणून निराश आहात? चाणक्य नीतीतील ‘या’ २ सवयी आजपासून अंगीकारा!

हरतालिकेची पूजा का करतात? एका क्लिकमध्ये वाचा व्रताचे महत्त्व!

Marathi News Live Updates : एनडीए "१७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत देशभरात 'सेवा संकल्प' अभियान' राबवणार : अमित शहा

SCROLL FOR NEXT