Pune entrepreneurship initiative receives Rs 1 5 crore donation by pratap pawar Sakal
पुणे

Pune : पुणे उद्योजकता उपक्रमाला दीड कोटी रुपयांची देणगी

विद्यार्थी सहाय्यक समितीचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी समितीच्या उद्योजकता विकास उपक्रमाला दीड कोटी रुपयांची देणगी दिली आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : विद्यार्थी सहाय्यक समितीचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी समितीच्या उद्योजकता विकास उपक्रमाला दीड कोटी रुपयांची देणगी दिली आहे. वेगाने बदलणारे तंत्रज्ञान आत्मसात करताना विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकतेचे बीज रुजावे, यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात येत आहे.

समितीच्या वतीने विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून नोकरीयोग्य विद्यार्थी घडविताना बदलत्या काळानुसार त्यांच्या मनात उद्योजकतेचे बीज रोवले जावे, अशी कल्पना अध्यक्षांसह विश्वस्त मंडळाने मांडली. अध्यक्ष पवार केवळ कल्पना मांडून थांबले नाहीत.

तर या योजनेला उत्तेजन देण्यासाठी दीड कोटींची देणगी समितीकडे जमा केली. ही रक्कम ‘कॉर्पस’मध्ये ठेवून दरवर्षी मिळणाऱ्या व्याजातून उद्योजकता विकास उपक्रमासाठी खर्च करावी. त्यासंबंधी विश्वस्तांना पूर्ण स्वातंत्र्य आहे,

अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. समितीच्या विश्वस्त मंडळाने या कल्पनेचे स्वागत करत देणगी स्वीकारली. तसेच योजनेला शारदाबाई गोविंदराव पवार उद्योजकता विकास आणि प्रशिक्षण कार्यक्रम, असे नावही जाहीर केले आहे.

काळाची गरज ओळखून विद्यार्थ्यांनी अधिकाधिक कौशल्य आत्मसात करणे आवश्यक आहे. नोकऱ्यांची मर्यादा लक्षात घेता विद्यार्थ्यांनी नवे तंत्रज्ञान आत्मसात करावे. त्यातून कोणी उद्योजक घडले तर हे समितीचे यश असेल. उपक्रमाला आर्थिक बळ देणे आवश्यक आहे. त्याची सुरुवात मी माझ्यापासूनच केली.

- प्रतापराव पवार, अध्यक्ष, विद्यार्थी सहाय्यक समिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT