जिल्ह्यात ५० हजार ४४८ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण
--
१४ हजार २०७ लाभार्थ्यांचे प्रमाणीकरण अद्याप प्रलंबित
--
ॲग्रोवन वृत्तसेवा
पुणे : ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’अंतर्गत पुणे जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण अंतिम टप्प्यात आले आहे. जिल्ह्यातील ६४ हजार ६५५ पात्र लाभार्थ्यांपैकी आतापर्यंत ५० हजार ४४८ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे. उर्वरित १४ हजार २०७ लाभार्थ्यांचे प्रमाणीकरण प्रलंबित असून, त्यांनी ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
तालुकानिहाय प्रमाणीकरणात दौंड आघाडीवर असून, तेथे १० हजार ६४३ शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे. त्यापाठोपाठ इंदापूरमध्ये नऊ हजार २३१, बारामतीत आठ हजार ५७८ आणि शिरूरमध्ये चार हजार ७२९ शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण झाले आहे.
पुरंदरमध्ये तीन हजार १४३, भोरमध्ये दोन हजार ३०८, खेडमध्ये दोन हजार २०८, जुन्नरमध्ये दोन हजार १५५, मावळमध्ये एक हजार ३५२, हवेली व आंबेगावमध्ये प्रत्येकी एक हजार ३५१, मुळशीत ५७३ आणि वेल्ह्यात ४२९ शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे.
राष्ट्रीयीकृत व इतर बँकांमधील लाभार्थ्यांपैकी दोन हजार ३९७ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले असून, एक हजार ८४७ प्रकरणे अद्याप प्रलंबित आहेत. योजनेचा लाभ मिळण्यासाठी आधार प्रमाणीकरण आवश्यक आहे. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी संबंधित बँक किंवा सेवा केंद्राशी संपर्क साधून प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
चौकट
प्रमाणीकरण पूर्ण करण्याचे आवाहन
पुणे जिल्ह्यातील एकूण ६४ हजार ६५५ पात्र लाभार्थ्यांपैकी १४ हजार २०७ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण अद्याप प्रलंबित आहे. त्यात दौंड तालुक्यात एक हजार ८८३, इंदापूरमध्ये एक हजार ८३१, भोरमध्ये एक हजार ५१५, खेडमध्ये एक हजार ९४ आणि हवेलीमध्ये एक हजार दोन प्रकरणांचा समावेश आहे. संबंधित शेतकऱ्यांनी विलंब न करता प्रमाणीकरण पूर्ण करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.