drama sakal
पुणे

Pune : ‘सकाळ’तर्फे पुणेकर नाट्यरसिकांना मेजवानी

नाट्य महोत्सव : १८ ते २२ मेदरम्यान रंगणार; पाच वैविध्यपूर्ण नाटकांचे प्रयोग

सकाळ वृत्तसेवा

पुणे - रंगभूमीवर प्रेम करणाऱ्या पुणेकर नाट्यरसिकांसाठी खास ‘नाट्य’मेजवानी पेश करण्यात येणार आहे. येत्या १८ ते २२ मे दरम्यान ‘सकाळ’तर्फे नाट्य महोत्सवाचे आयोजन केले असून वैविध्यपूर्ण विषयांवरील पाच दर्जेदार नाटकांचा आस्वाद यात रसिकांना घेता येणार आहे.

जंगली महाराज रस्त्यावरील बालगंधर्व रंगमंदिरात दररोज रात्री ९.३० वाजता हा महोत्सव पार पडेल. मराठी रंगभूमीवरील आघाडीचे कलाकार प्रशांत दामले, चंद्रकांत कुलकर्णी, भरत जाधव, कविता लाड-मेढेकर, वर्षा उसगावकर,

केदार शिंदे, संकर्षण कऱ्हाडे, प्राजक्त देशमुख आदींचा कलाविष्कार महोत्सवाच्या निमित्ताने अनुभवता येणार आहे. या महोत्सवादरम्यान मराठी रंगभूमीवर अतुलनीय योगदान देणाऱ्या एका ज्येष्ठ कलाकाराचा ‘नाट्यगौरव पुरस्कार’ प्रदान करून सन्मान करण्यात येणार आहे. तसेच, एका पडद्यामागील कलाकाराच्या योगदानाचाही विशेष पुरस्कार देऊन गौरव केला जाणार आहे.

पाच दिवस चालणाऱ्या या महोत्सवाची दैनंदिन आणि सीझन, अशा दोन्ही प्रकारांत तिकिटे उपलब्ध असतील. दैनंदिन तिकिटे bookmyshow.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

तसेच, दैनंदिन व संपूर्ण महोत्सवाची तिकिटे ९५९५८३०५५५ या क्रमांकावर संपर्क साधून आरक्षित करता येणार आहेत. संपूर्ण महोत्सवाची तिकिटे आरक्षित करणाऱ्‍या रसिकांना तिकिटांच्या दरात भरघोस सवलत देणार आहे. तसेच, दैनंदिन तिकिटांसाठीही विशेष सवलत देणार आहे. प्रत्यक्ष नाट्यगृहावरही तिकिटे लवकरच उपलब्ध होतील.

रसिकांचेही ‘पदार्पण’

‘सकाळ माध्यम समूहा’ने आपल्या उपक्रमांमध्ये कायमच सामाजिक भान जपले आहे. या नाट्य महोत्सवातही तीच परंपरा कायम राखत एक अनोखी सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. आजवर कधीही नाटक न पाहिलेल्या काही प्रेक्षकांना महोत्सवातील नाटके आवर्जून दाखवण्यासाठी निमंत्रित केले जाणार आहे.

‘सारखं काहीतरी होतंय’

‘एका लग्नाची

पुढची गोष्ट’

‘तू तू मी मी’

‘संगीत देवबाभळी’

‘नियम व अटी लागू’

महोत्सवाचे तपशील...

कधी : १८ ते २२ मे

केव्हा : दररोज रात्री ९.३० वाजता

कुठे : बालगंधर्व रंगमंदिर, जंगली महाराज रस्ता

वैशिष्ट्ये काय?

विविध विषयांवरील पाच दर्जेदार नाटकांचा समावेश

मराठी रंगभूमीवरील आघाडीच्या कलाकारांचा सहभाग

रंगभूमीवर अतुलनीय योगदान दिलेल्या कलाकाराचा सन्मान

कधीही नाटक न पाहिलेल्या रसिकांना सामावून घेण्याचा विशेष प्रयत्न

विद्यार्थ्यांना तिकीट दरात भरघोस सवलत

संपूर्ण महोत्सवाचे तिकीट घेतल्यास विशेष सवलत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT