पुणे

गणेशवंदनेने पुणेकरांची जिंकली मने 

सकाळवृत्तसेवा

पुणे - कथ्थक आणि भरतनाट्यम्‌च्या ‘फ्युजन’वर नृत्यांगणांनी साकारलेली गणेशवंदना, पुलं, गदिमा आणि बाबूजींच्या गीतांचा ‘त्रिवेणी संगम’, कोळी नृत्य, पंजाबी, राजस्थानी नृत्यासह चित्तथरारक योगासनांनी पुणेकरांची मने जिंकली. दिमाखदार वातावरणात शुक्रवारी श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे ३० व्या पुणे फेस्टिव्हलचे उद्‌घाटन खासदार आणि अभिनेत्री हेमामालिनी यांच्या हस्ते झाले.

या वेळी पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, सुरेश कलमाडी आणि मीरा कलमाडी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. या वेळी ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले, सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, बिहारचे माजी राज्यपाल डी. वाय. पाटील, बीव्हीजी ग्रुपचे अध्यक्ष हणमंत गायकवाड यांचा मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. कलमाडी यांच्या हस्ते केरळ पूरग्रस्तांच्या मदतीसाठी दोन लाखांचा धनादेश पालकमंत्री बापट यांना देण्यात आला. 

हा माझा घरचा कार्यक्रम
गेल्या ३० वर्षांमध्ये फेस्टिव्हलच्या उद्‌घाटनप्रसंगी २७ वेळा गणेशवंदना सादर करणाऱ्या ‘ड्रीम गर्ल’ अर्थात हेमामालिनी यांनी, ‘पुणे फेस्टिव्हल हा माझा घरचा कार्यक्रम, पुढच्या वर्षी ‘बॅले गंगा’ नृत्य नक्की सादर करेन,’ असे जाहीर करीत पुण्याशी आपले नाते आणखी दृढ करण्याचा प्रयत्न केला. 

फेस्टिव्हलमध्ये...
ढोल-ताशांच्या निनादात दुमदुमले कलामंच
दैठणकर यांच्या सनई-चौघडा वादनाने मंगलमय वातावरण
नऊवारी साडी, फेटे, गजरे आणि नथ परिधान केलेल्या परदेशी तरुणी  
श्‍वास रोखायला लावणारी लहानग्यांची योगासने 
आधुनिक जगातील स्त्रीशक्तीची रुपे सांगणारा पुणेरी स्टाइल पोवाडा फ्युजन
गणेश कला रंगमंच गर्दीने फुलले

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

ढिंग टांग : महाशक्तीचे महावाटप...!

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 03 मे 2024

आंबा : उन्हाळ्याचा अनभिषिक्त राजा

Latest Marathi News Live Update : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कोल्हापुरात दाखल, मतदारसंघातील प्रचाराचा घेणार आढावा

SCROLL FOR NEXT