Drought
Drought 
पुणे

#दुष्काळाच्या झळा : दुष्काळावर मात करण्यासाठी आपत्ती निवारण कक्ष

सकाळवृत्तसेवा

पुणे - जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी चारा व्यवस्थापन आणि पाणीटंचाई कृती आराखडा राबविण्यात येत आहे. त्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांच्या समन्वयाखाली जिल्हाधिकारी कार्यालयात दुष्काळ आपत्ती निवारण कक्ष सुरू 
केला आहे. 

राज्य सरकारने पुणे जिल्ह्यात सात तालुक्‍यांमध्ये दुष्काळ जाहीर केला. त्यानंतर उर्वरित पाच तालुक्‍यांमधील १९ महसुली मंडलांच्या 
कार्यक्षेत्रातील गावांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. त्यात जुन्नर तालुक्‍यातील सहा महसूल मंडळे, खेड तालुक्‍यामधील चार, हवेली तालुक्‍यात सात, मुळशी आणि भोर तालुक्‍यातील प्रत्येकी एक महसूल मंडळामधील गावांचा समावेश आहे. या सर्व गावांमध्ये नागरिकांना पिण्याचे पाणी, रोजगार उपलब्ध करून देणे आणि जनावरांसाठी चाऱ्याचे व्यवस्थापन करण्याच्या कामास सुरवात झाली आहे. दुष्काळ आपत्ती निवारण कक्षाच्या माध्यमातून या कामांमध्ये समन्वय ठेवण्यात येणार आहे. 

त्यासाठी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याकडून नियमित आढावा घेण्यात येत असल्याची माहिती डॉ. कटारे यांनी 
दिली. 

जिल्ह्यात २७ टॅंकरने पाणीपुरवठा 
पाणीटंचाई असलेल्या तालुक्‍यांतील गावे आणि वाड्यांमध्ये २७ सरकारी टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यात बारामती तालुक्‍यात १०, शिरूर तालुक्‍यात ८, दौंड तालुक्‍यात ४, जुन्नर आणि पुरंदर तालुक्‍यात प्रत्येकी दोन आणि आंबेगाव तालुक्‍यात एका टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात 
येत आहे. 

जिल्ह्यात दोन महिने पुरेल इतका चारा
जिल्ह्यात दर महिन्याला जनावरांसाठी एक लाख ७२ हजार मेट्रिक टन चारा लागतो. येत्या दोन महिन्यांत पुरेल इतका चारा उपलब्ध आहे. परंतु, त्यानंतर चारा उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन करण्यात येत असल्याचे प्रशासनाने सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Video : नरेंद्र मोदींनी काढली बाळासाहेब ठाकरेंची आठवण; म्हणाले, डीएमकेचे लोक सनातन धर्माला डेंग्यू म्हणत आहेत...

IPL 2024 DC vs MI Live Score : मुकेश कुमारने टीम डेविडचा अडथळा केला दूर; मुंबईचा 6 फलंदाज आऊट

PM Modi Kolhapur Rally: पंतप्रधान मोदींच्या सभेला संभाजी भिडेंची हजेरी; मोदींचं कोल्हापुरकरांना पुन्हा सत्तेत आणण्याचं केलं आवाहन

Tristan Stubbs DC vs MI : 4,4,6,4,4,4 एकाच षटकात होत्याचं नव्हतं झालं! स्टब्सच्या तडाख्यात वूडची शकलं

Latest Marathi News Live Update : पाच वर्षात पाच पंतप्रधान करण्याचा इंडिया आघाडीचा प्लॅन- मोदी

SCROLL FOR NEXT