additional commissioner vikas dhakane Sakal
पुणे

Pune Potholes : खड्डे बुजवा, अन्यथा कारवाई; विकास ढाकणे यांचा इशारा

शहरातील खड्डे बुजविण्याच्या कामाला गती येत नसल्याने आता ९ ऑगस्टपर्यंत कामे पूर्ण करा, अन्यथा थेट पथ विभागाच्या कनिष्ठ अभियंत्यांवर कारवाई केली जाईल, असा इशारा आज बैठकीत देण्यात आला.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - शहरातील खड्डे बुजविण्याच्या कामाला गती येत नसल्याने आता ९ ऑगस्टपर्यंत कामे पूर्ण करा, अन्यथा थेट पथ विभागाच्या कनिष्ठ अभियंत्यांवर कारवाई केली जाईल, असा इशारा आज बैठकीत देण्यात आला आहे. खड्डे बुजविताना सर्वाधिक वर्दळ असलेल्या ९२ किलोमीटर लांबीच्या प्रमुख १५ रस्‍त्यांसह त्यांना जोडणाऱ्या छोट्या रस्त्यांना प्राधान्य दिले जाणार आहे.

महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी यासंदर्भात आज पथ विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यामध्ये शहरातील रस्ते दुरुस्तीच्या कामाचा आढावा घेण्यात आला. जुलै महिन्यात झालेल्या पावसामुळे शहराच्या सर्वच भागातील रस्त्यांना खड्डे पडले आहेत.

महापालिकेकडून हॉटमिक्स, कोल्डमीक्स, मुरूम टाकून खड्डे बुजविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. सध्या पावसाने उघडीप घेतल्याने खड्डे बुजविण्याचे काम गतीने करणे आवश्‍यक आहे, महापालिकेचा येरवडा येथील हॉटमिक्स प्लांट बंद पडल्याने या कामात अडथळा निर्माण झाला आहे.

अतिरिक्त आयुक्त ढाकणे यांनी आज घेतलेल्या बैठकीमध्ये कार्यकारी अभियंत्यांनी त्यांच्या हद्दीतील मुख्य रस्ते आणि जोड रस्ते एकत्र येतात अशा चौकातील खड्डे तातडीने बुजवावेत. तसेच शहरातील १५ व्हीआयपी रस्त्यांची यादी तयार केली आहे. त्यावर मोठ्या प्रमाणात वर्दळ असते.

त्यामुळे तेथे खड्डे पडल्याने वाहतूक कोंडी होते, त्यामुळे असा रस्त्यांची दुरुस्ती ९ ऑगस्टपर्यंत पूर्ण करावी असे आदेश दिले आहेत. यानंतर या रस्त्यावर खड्डे दिसल्यास या रस्त्यांची जबाबदारी असणाऱ्या कनिष्ठ अभियंत्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा बैठकीत दिला आहे.

‘शहरातील खड्डे बुजविण्याच्या कामाचा आज आढावा घेतला आहे. महत्त्वाच्या १५ रस्त्यांसह इतर रस्त्यांवरील खड्डे बुजवावेत, प्रत्येक रस्त्यासाठी कनिष्ठ अभियंत्याची जबाबदारी निश्‍चीत केली आहे. नऊ ऑगस्ट नंतर रस्त्यावर खड्डे दिसल्यास संबंधित कनिष्ठ अभियंत्यावर कारवाई केली जाईल.

- विकास ढाकणे, अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका

हॉटमिक्स प्लांट बंदच

बेअरिंग खराब झाल्याने महापालिकेचा हॉटमिक्स प्लांट बंद पडला आहे. तो आज सुरू होणे अपेक्षीत होते, पण गुरुवारी (ता. ३) रात्रीपर्यंतही दुरुस्तीचे काम सुरूच होते. त्यामुळे दिवसभरात खड्डे बुजविण्याच्या कामाला गती आलेली नाही. तसेच ठेकेदाराकडून माल घेऊन खड्डे बुजविले जात आहेत.

हे आहेत प्रमुख १५ रस्ते आणि त्यांची लांबी (लांबी किलोमीटरमध्ये)

  • नगर रस्ता - १४

  • सोलापूर रस्ता - ६

  • मगरपट्टा रस्ता - ७

  • पाषाण रस्ता - ३.५

  • बाणेर रस्ता - ७.५

  • संगमवाडी रस्ता - ४.३

  • विमानतळ व्हीआयपी रस्ता - ४.५

  • कर्वे रस्ता -६.५

  • पौड रस्ता - ४.३

  • सातारा रस्ता - ७

  • सिंहगड रस्ता - ९

  • बिबवेवाडी रस्ता - ४.५

  • नार्थमेन रस्ता - ३.६

  • गणेशखिंड रस्ता - ३.३

  • बाजीराव रस्ता - ७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune : पबवर पहाटे ३ वाजता पोलिसांची धाड, सुरू होता धक्कादायक प्रकार; ८० ते १०० तरुण तरुणी ताब्यात

Satej Patil Dhananjay Mahadik : बंटी पाटील-मुन्ना महाडिक तब्बल १२ वर्षांनी एकत्र; डी. वाय. पाटलांच्या आठवणींना उजाळा, सतेज-संजय पाटील यांचे कौतुक

Indian Air Force Office: पाकच्या ‘हनीट्रॅप’मध्ये हवाई दलाचा अधिकारी; लष्कराची माहिती पाकिस्तानला दिली

Marathi News Live Updates : मुख्यमंत्री फडणवीस कोल्हापूर विमानतळावर दाखल

Mahindra 15000 Crore Project: बुटीबोरीत महिंद्राला ८०० एकर जागा; औद्योगिक विकासाला मिळणार चालना; १५ हजार कोटींचा प्रकल्प

SCROLL FOR NEXT