Fire Raviwar Peth  
पुणे

Pune : रविवार पेठेत खानावळीला आग, सिलेंडरचा स्फोट

अग्निशामक दलाच्या जवानांनी 3 सिलेंडर, तेलाचे डबे तत्काळ बाहेर काढल्याने मोठी दुर्घटना टळली

सकाळ वृत्तसेवा

पुणे : रविवार पेठेतील एका खानावळीमध्ये सिलेंडरचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत खानावळ जळून खाक झाली. याबरोबरच दुसऱ्या मजल्यावर घरालाही आगीची झळ पोचली. अग्निशामक दलाचे जवान वेळीच घटनास्थळी पोहोचल्याने त्यांनी सिलेंडर व तेलाचे डबे तत्काळ बाहेर काढल्यामुळे मोठी दुर्घटना टळली अग्निशामक दलाने काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळविले.

रविवार पेठेतील गवळीवाडा येथे मंगळवारी सकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास एका खानावळीला आग लागल्याची खबर अग्निशामक दलाच्या मुख्य नियंत्रण कक्षाला मिळाली. त्यानंतर काही वेळातच अग्निशामक दलाच्या मध्यवर्ती केंद्र, कसबा केंद्र येथून अग्निशामक दलाच्या दोन गाड्या एक पाण्याचा टँकर व देवदूत घटनास्थळी दाखल झाले.

अग्निशामक दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा करून आगीवर काही वेळातच नियंत्रण मिळवले, त्यानंतर आगीमध्ये सापडलेले तीन ते चार सिलेंडर जवानाने तत्काळ बाहेर काढले. याबरोबरच तेलाचे काही डबे देखील जवानांनी बाहेर काढले त्यामुळे मोठी दुर्घटना होण्यापासून टळली.या घटनेमध्ये इमारतीच्या पहिल्या मजल्यावरही हा पोहोचल्याने तेथील घरांनाही आगीची झळ लागली.

सुदैवाने या घटनेमध्ये कोणीही जखमी झाले नाही अग्निशामकू दलाच्या जवानांनी आगीमध्ये फुटलेला एक सिलेंडर बाहेर काढला. मध्यवर्ती केंद्राचे प्रभारी अधिकारी प्रशांत गायकर व त्यांच्या पथकाने या आगीवरती नियंत्रण मिळवले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Ship Toll Plan: होर्मुज स्ट्रेटमध्ये नवा ट्रॅफिक सिस्टम लागू करणार! इराणचा मोठा निर्णय; संपूर्ण प्लॅनच सांगितला

PBKS vs RCB, Playing XI: बंगळुरूने पंजाबविरुद्धच्या सामन्यासाठी अचानक कर्णधार बदलला, खरं कारण काय?

वयाच्या ४६व्या वर्षीही मुक्ता बर्वे अविवाहित का आहे? 'या' व्यक्तीवर होता क्रश, म्हणाली, 'एखाद्याच्या आयुष्यात...

LPG ग्राहकांना मोठा दिलासा! २० हजार टन एलपीजी घेऊन जहाज भारतात दाखल, गॅस पुरवठ्याचं टेन्शन कमी होणार

'तुला मुलीच होतात, मुलगा नाही...'; म्हणत पतीनं पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड टाकलं; पुण्यातील धक्कादायक घटना

SCROLL FOR NEXT