Accident sakal
पुणे

Pune Accident : भरधाव मोटारीने आठ वाहनांना उडवले; चारजण जखमी

भरधाव मोटारीने एकामागून एक आठ वाहनांना पाठीमागून जोरात धडक दिली. ही घटना शिवाजीनगर येक्षील एलआयसी इमारतीसमोर रस्त्यावर घडली.

सकाळ वृत्तसेवा

भरधाव मोटारीने एकामागून एक आठ वाहनांना पाठीमागून जोरात धडक दिली. ही घटना शिवाजीनगर येक्षील एलआयसी इमारतीसमोर रस्त्यावर घडली.

पुणे - भरधाव मोटारीने एकामागून एक आठ वाहनांना पाठीमागून जोरात धडक दिली. ही घटना शिवाजीनगर येक्षील एलआयसी इमारतीसमोर रस्त्यावर बुधवारी रात्री घडली. या अपघातात चारजण किरकोळ जखमी झाले आहेत. शिवाजीनगर पोलिसांनी वाहनचालकाला ताब्यात घेतले आहे.

या संदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खासगी प्रवासी वाहतूक करणारा मोटारचालक रात्री पावणेआठच्या सुमारास संचेती हॉस्पिटलच्या दिशेने भरधाव जात होता. या मोटारीने चार दुचाकीस्वार आणि चार मोटारींना पाठीमागून जोरात धडक दिली. त्यात चारजण जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

‘ड्रंक ॲन्ड ड्राइव्ह’मधून हा अपघात घडल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. पोलिसांनी मोटारचालकाला ताब्यात घेतले असून, त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Datia Bypoll BJP Crisis : भाजपने माजी गृहमंत्र्यांचे तिकीट कापले, नाराज कार्यकर्त्यांकडून शहरात जाळपोळ, महामार्ग रोखला; पोलिसांवरही दगडफेक

Rameshbhai Kacholia Passes Away : हजारो सामाजिक संस्थांचा आधारवड हरपला, रमेशभाई गुलाबचंद कचोलिया यांचे मुंबईत निधन

Solapur: मोफत वधू-वर सूचक सेवेतून 3 हजारांहून अधिक संसारांना नवी दिशा; इरण्णा पनशेट्टी यांचे समाजसेवेचे प्रेरणादायी कार्य

Fake ₹500 Notes Seized : जळगावात सिनेस्टाईल थरार! बैलगाडीला धडक देऊन पळणाऱ्या कारमधून 500 रुपयांच्या नकली नोटा अन् तलवारी जप्त; 24 बंडले आढळल्याने गूढ वाढले

Akola: बोगस बियाण्यांवरून कृषी अधिकाऱ्यांना कक्षात डांबले; संतापाचा उद्रेक; शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन

SCROLL FOR NEXT