Pune Ganeshotsav Sakal
पुणे

Ganeshotsav : नियोजनाच्या बैठकीवरून गणेश मंडळांत नाराजी

मानाच्या व प्रमुख मंडळांसोबत आधी बैठक घेतल्याने इतर मंडळांचा बैठकीवर बहिष्कार

सकाळ वृत्तसेवा

पुणे - आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमिवर आयोजित करण्यात आलेल्‍या बैठकीसाठी मानाचे व प्रमुख गणेश मंडळांना पहिला मान दिल्याने इतर गणेशोत्सव मंडळांनी बैठकीवरच बहिष्कार टाकला. पुणे पोलिसांनी ही बैठक आयोजित केली होती.

नियोजनाच्या बैठकीबाबत दुजाभाव केला जात असल्याचा आरोप करीत इतर मंडळांनी पोलिस प्रशानासनावर नाराजी व्यक्त केली आहे.

गणेशोत्सव अवघ्या दीड महिन्यावर येऊन ठेपल्याने त्याच्या नियोजनासाठी बुधवारी (ता. ९) पोलिस आयुक्तालयात पोलिस आयुक्त रितेश कुमार आणि सहपोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या उपस्थित बैठक आयोजित करण्यात आली होती.

त्यानुसार शहरातील अनेक गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी १२ वाजता आयुक्तालयात दाखल झाले होते. मात्र दुपारचे एक वाजले तरी बैठक सुरू न झाल्याने पदाधिकाऱ्यांनी नेमकी बैठक कधी सुरू होणार याबाबत विचारणा केली. तेव्हा त्यांना समजले की, सकाळी दहा वाजताच शहरातील मानाचे पाच गणेश मंडळ आणि प्रमुख गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

त्या बैठकीला उशीर झाल्याने १२ वाजताची मिटींग लांबली. ही बाब लक्षात आल्यानंतर १२ वाजताच्या बैठकीला बोलावलेल्या मंडळांनी बैठकीवर बहिष्कार घातला. पदाधिकारी निघून जात असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिस पदाधिकाऱ्यांनी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र चिडलेल्या पदाधिकाऱ्यांनी आयुक्तालयातून काढता पाय घेतला.

गल्लीतील मंडळ असो व मानाचे किंवा प्रमुख मंडळ, या सर्वांची नियोजनाची एकत्रित बैठक आत्तापर्यंत आयोजित केली जात होती. यंदा मात्र त्या परंपरेत खंड पडला. मानाच्या व महत्त्वाच्या गणपती मंडळांप्रमाणेच शहरातील अनेक मंडळाची गणेशोत्सवाची परंपरा आहे. वेगळी बैठक घेण्याचे कारण काय आहे हे पोलिसांनी स्पष्ट करावे. आवाजाची मर्यादा, विसर्जन मिरवणुकीतील नियोजन यासर्वांसाठी आमचे प्रशासनाला सहकार्य असते. त्यामुळे मंडळांमध्ये दुजाभाव करणे योग्य नाही.

- श्‍याम मानकर, अध्यक्ष, हत्ती गणपती मंडळ

नुकतेच पकडण्यात आलेले दहशतवादी आणि आगामी गणेशोत्सव मंडळ याबाबत अनौपचारिक चर्चा करण्यासाठी काही मंडळांना पोलिस आयुक्तालयात बोलावण्यात आले होते. त्यात कोणताही औपचारिक निर्णय झाला नाही. आम्ही भेटून गेल्यानंतर दुसरी बैठक आयोजित करण्यात आली होती, याची काहीच कल्पना आम्हाला नव्हती.

- श्रीकांत शेटे, अध्यक्ष, श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ

पुणे पोलिसांच्या झोन एकच्या हद्दीत असलेल्या मंडळांच्या पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा करण्यासाठी त्यांना आमंत्रित करण्यासाठी आले होते. त्या बैठकीला थोडा उशीर झाल्याने व इतर मंडळांना वगळून बैठक बोलावली, असा गैरसमज झाल्याने काही गणेश मंडळांनी नाराजी व्यक्त केली. मात्र वस्तुस्थिती सर्वांना समाजावून सांगण्यात आली. याबाबत चर्चा करण्यासाठी गुरुवारी (ता. १०) सर्व मंडळासोबत बैठक आयोजित करण्यात आली आहे.

- संदीप कर्णिक, सहपोलिस आयुक्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today : शेअर बाजाराची लाल रंगात सुरुवात मात्र काही मिनिटांतच तेजीत! कोणते शेअर्स वाढले?

MPSC Success Story: वीटभट्टी कामगाराच्या मुलाची जिद्दीने यशाला गवसणी; एमपीएससी परीक्षेतून बनला कृषी उपसंचालक, आई-वडीलांनी उपाशी राहून दिलं शिक्षण!

विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! पाठ्यपुस्तकांबरोबर आता दफ्तरही मिळणार मोफत; ४२ लाख विद्यार्थ्यांना होणार फायदा

Latest Marathi News Update: काँग्रेस भवनात दगडफेक प्रकरणी १०० पेक्षा जास्त जणांवर गुन्हा

Kolhapur Crime : आठ दिवस भीतीत, सोने विकल्यानंतर बिनधास्त; अखेर पंचवीस दिवसांनी संशयित पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT