पुणे

शिक्षक, पदवीधर निवडणूक जाहीर

CD

लोगो : पुणे विभाग पदवीधर निवडणूक

महायुतीकडून लाड यांची चर्चा; ‘मविआ’कडून उमेदवाराचा शोध
राष्ट्रवादी काँग्रेसकडून हर्षदा देशमुख, भैय्यासाहेब माने यांचीही नावे चर्चेत

सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. २२ : पुणे विभागातील शिक्षक, पदवीधर निवडणूक जाहीर झाली आहे. महायुतीकडून पदवीधर मतदारसंघातून शरद लाड यांच्या नावाची चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री हसन मुश्रीफ यांचे समर्थक भैय्यासाहेब माने (कोल्हापूर) व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांची कन्या हर्षदा देशमुख याही पदवीधर मतदारसंघातून इच्छुक असल्याचे कळते.
मागील वेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवलेले अरुण लाड भाजपवासी झाले, यामुळेच ते महायुतीकडून प्रबळ दावेदार मानले जात आहेत. पण दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडून हसन मुश्रीफ यांनीही दावा केला आहे. महाविकास आघाडीमधील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडूनही इच्छुक आहेत. पण अद्याप कोणाला उमेदवारी द्यायची, याबाबत शोध सुरू आहे.
पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढवण्याबाबत महाविकास आघाडीकडून अद्याप कोणतीही तयारी दिसत नाही. पदवीधर मतदारसंघातून कोण, याबाबत महाविकास आघाडीकडून चाचपणी सुरू आहे. विद्यमान आमदार अरुण लाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातून भाजपत प्रवेश केल्याने त्यांच्या ठिकाणी महाविकास आघाडी कोण उमेदवार देणार, याबाबत अद्याप पक्षाकडून कोणतीही भूमिका जाहीर केली नाही. पुणे, कोल्हापूर व सातारा जिल्ह्यातील इच्छुकांची संख्या मोठी आहे. मागील निवडणुकीत अरुण लाड यांनी भाजपचे पृथ्वीराज देशमुख (सांगली) यांचा पराभव केला होता. पण आता अरुण लाड यांचे चिरंजीव शरद लाड यांना महायुतीकडून उमेदवारीची दाट शक्यता आहे. तर विरोधक महाविकास आघाडीचे चित्र दोनच दिवसांत समोर येणार आहे.

चौकट...
जिल्ह्यात पदवीधरचे ३७ हजार ९५७ मतदार
सोलापूर जिल्ह्यात पदवीधरचे ३७ हजार ९५७ मतदार आहेत. या निवडणुकीसाठी २९ सप्टेंबर २०२६ रोजी अधिसूचना प्रसिद्ध होईल. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ६ ऑक्टोबर आहे. अर्जांची छाननी ७ ऑक्टोबर, तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख ९ ऑक्टोबर आहे. मतदान २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ या वेळेत होईल. मतमोजणी २७ ऑक्टोबर रोजी करण्यात येणार आहे.

चौकट...
मतदारसंख्येत भर पडणार
पदवीधर मतदारसंघात जिल्ह्यात ३७ हजार ९५७ तर शिक्षक मतदारसंघात १३ हजार १३६ मतदार आहेत. ६ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत असल्याने सप्टेंबर अखेरपर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. त्यानंतर अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. निवडणूक कार्यालयांकडून मतदार नोंदणी अर्ज स्वीकारण्यात येत असल्याने मतदारसंख्येत आणखी भर पडणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहील मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट! परीक्षेदरम्यान प्राध्यापकांनी बाजूला नेलं अन्..., CCTV फुटेज समोर, 15 मिनिटांत काय घडलं?

Junnar News : शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले.

लहानपणीचं गाणं आजही तोंडपाठ आहे, पण कालचा अभ्यास लक्षात राहत नाही; असं का? जाणून घ्या मेंदूचं रहस्य

Marathi News Live Updates: धाराशिवमध्ये पावसाला सुरुवात

DPL Fixing Controversy: दिल्ली प्रीमियर लीगमध्ये फिक्सिंगचा संशय? वंश बेदीकडे क्रिकेटपटूचा संपर्क; लगेच दिली अँटी करप्शनला माहिती

SCROLL FOR NEXT