Gudi padwa sakal
पुणे

Gudi padwa 2023 : संकल्पनांची गुढी उभारून सांगवीत गुढीपाडवा उत्साहात साजरा

जुनी सांगवी येथे माझं पिंपरी चिंचवड माझी स्मार्ट सांगवी

रमेश मोरे

जुनी सांगवी : जुनी सांगवी येथे माझं पिंपरी चिंचवड माझी स्मार्ट सांगवी या उपक्रमाखाली विविध संकल्प व संकल्पना मांडत प्रशांत शितोळे मित्र परिवार व गावक-यांच्या वतीने चौकांमधून संदेश फलक लावत मराठी नववर्षाची गुढी उभारून गुढीपाडवा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.

येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुतळा परिसरात सात भव्य गुढ्या उभारुन त्या खाली विविध संदेश फलक लावण्यात आले होते.यात माझं पिंपरी चिंचवड माझी स्मार्ट सांगवी, संकल्प गुढी जाज्वल्य इतिहासाची, कचरामुक्त स्वच्छ सांगलीची,सांगवीच्या प्रगतीची, महागाई मुक्तीची,माफक विद्यूत दराची, २४ तास पाणी पुरवठ्याची असा मजकूर असलेले संदेश फलक लावण्यात आले होते.सकाळी चौकाचौकांत धून गुढी उभारून पुजन करण्यात आले. यावेळी बोलताना प्रशांत शितोळे म्हणाले,

सांगवी हे सांस्कृतिक आध्यात्मिक शांतताप्रिय गाव ते स्मार्ट उपनगर म्हणून पंचक्रोशीत ओळखले जाते.येथील ग्रामदैवत वेताळ महाराज,संत श्री गजानन महाराज मंदिर, श्रीकृष्ण मठ, राममंदिर,श्री दत्त आश्रम ही सांगवीची अध्यात्मिक ओळख आहे. महाराष्ट्र व विविध प्रांतातील नागरिक येथे गुण्यागोविंदाने राहतात.

मराठी नववर्ष साजरे करत असताना नागरिकांच्या समस्या व त्याची जाणीव व्हावी.पाणी, महागाईवर उपाय व्हावा.माझं पिंपरी चिंचवड व माझी स्मार्ट सांगवी ही भावना जनमानसात रुजावी हा संकल्प म्हणून या मागील उद्देश आहे.

यावेळी कुमार ढोरे, प्रकाश ढोरे, लालिदास ढोरे, दशरथ ढोरे उज्वला ढोरे, सुषमा तनपुरे, स्वामिनी जाधव,शशिकांत ढमाले, नारायण ढोरे, पंकज कांबळे,सुनिल गावडे,विकास लोले, कुणाल गोसावी, सुनिल ढोरे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TB मुक्तीसाठी 'सरपंचां'ना साकडं! गावागावांत 'हँड हेल्ड एक्स-रे'द्वारे स्क्रीनिंग; लक्षणे नसलेल्या रुग्णांना शोधून मोफत उपचार

आजचे राशिभविष्य - 16 ऑगस्ट 2026

Aries Weekly Horoscope: मेष राशीसाठी मोठी खुशखबर! जुने वाद मिटणार, नवी दारे उघडणार; 'या' दिवसांत मिळेल भाग्याची साथ

साप्ताहिक राशिभविष्य : (१६ ऑगस्ट २०२६ ते २२ ऑगस्ट २०२६)

Taurus Weekly Horoscope: वृषभ राशीच्या नशिबाला मिळणार मोठी कलाटणी! नोकरी, पैसा आणि प्रवासात मिळणार अनपेक्षित लाभ

SCROLL FOR NEXT