pune  sakal
पुणे

Pune : वन्यजीव व सापांबद्दल श्री वाघेश्वर विद्याधाम कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

शिरूर वनविभागाच्या वतीने वन्यजीव सप्ताहानिमित्त वन्य प्राण्यांबाबत जागृती

दत्ता कदम

मांडवगण फराटा - "वन्य जीवांमधील अनेक प्राण्यांच्या जाती सध्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. वन्य जीवांच्या संवर्धनासाठी सर्व स्तरांतून प्रयत्न होणे गरजेचे आहे. कारण अन्न साखळी टिकण्यासाठी यातील सर्वच जीव महत्त्वाचे आहेत. जंगलांचे प्रमाण कमी झाल्याने वन्य प्राण्यांचा नैसर्गिक अधिवास नष्ट होऊ लागल्याने वन्यजीव भक्ष व पाण्याच्या शोधात मानवी वस्तीकडे वळला आहे.

घोड नदी व भीमा नदीच्या पट्ट्यात पाण्याची उपलब्धता व लपण्यासाठी ऊस क्षेत्र असल्याने या भागात बिबट्यांचे, घोणस, नाग, मन्यार यांसारख्या वन्य जीवांचे प्रमाण वाढले आहे. बिबट्या तसेच विषारी जातीच्या सापांपासून आपला बचाव करण्यासाठी आपण विशेष काळजी घेतली पाहिजे." असे प्रतिपादन वन विभागाचे नियतक्षेत्र अधिकारी विशाल चव्हाण यांनी केले. ते शिरूर वनविभागाच्या वतीने वन्यजीव सप्ताहानिमित्त श्री वाघेश्वर विद्याधाम कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य रामदास चव्हाण होते.

वन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या मनामध्ये सापां विषयी असणारे गैरसमज व भीती दूर करण्यासाठी सर्पमित्र सुनील कळसकर, गोंविद शेलार यांनी यावेळेस मार्गदर्शन केले. शिरूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रताप जगताप, वनपाल जी. आर. मेहेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर तालुक्यात वन्यजीव सप्ताहाचे निमित्ताने आयोजन करण्यात आले होते.

यावेळी उपप्राचार्य जयंत जोशी, पर्यवेक्षक गणपत बोत्रे, निसर्ग व सामाजिक पर्यावरण व प्रदुषण निवारण मंडळाचे कार्याध्यक्ष संतोष परदेशी, नियत क्षेत्राधिकारी एस. एस. भुतेकर, वनसेवक एन. बी. गांधले, सर्पमित्र मनोज चौधरी, अमोल पाटोळे, तुषार चकोर, शरीफ शेख, मिलींद निंबाळकर, प्रा. राजेंद्र कांबळे, प्रा. अमित माने, प्रा. केतन बनकर, प्रा. राजेंद्र फडके, प्रा. महेश माने, वैशाली वेदपाठक, मीनाकुमारी राठोड, अनिता रासकर, सपना करपे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष परदेशी यांनी केले. तर उपप्राचार्य जयंत जोशी यांनी उपस्थितांचे आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

चंद्रनाथ रथ कोण होते? हवाई दलाची नोकरी सोडून बनले सुवेंदू अधिकारी यांचे विश्वासू; भवानीपूर मतदारसंघाची होती जबाबदारी

अक्षय कुमार हॉस्पिटलमध्ये भरती, शूटिंगदरम्यान अक्षय कुमारच्या प्रकृतीत बिघाड? शस्त्रक्रिया पार, नक्की झालं तरी काय?

Pune Crime: मुलीवरील अत्याचारप्रकरणी कठोर कारवाई करा: उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे,आरोपीला जामीन न मिळावा अशी सरकारकडे मागणी

Solapur Crime: भांडीसंचासाठी मागितली लाच; कंत्राटी दोन ऑपरेटर जेरबंद, माढा तालुक्यातील उपळाई बुद्रूक येथील घटना!

Latest Marathi News Live Update : गांधीनगर मार्गावरील बेकायदा बांधकामे महापालिका उद्यापासून पाडणार : आयुक्‍त

SCROLL FOR NEXT