Pune Half Marathon sakal
पुणे

Pune Half Marathon : आत्मविश्वास वाढवणारी मॅरेथॉन : विक्रम कुमार

आरोग्याच्या आनंदसोहळ्यात पुणेकरांना सहभागी होण्याचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा

पुणे - क्रीडानगरी म्हणून देशभरात लौकिक मिळविणाऱ्या पुण्यामध्ये ‘सकाळ माध्यम समूहा’ने आयोजित केलेल्या ‘बजाज अलियान्झ पुणे हाफ मॅरेथॉन’ने स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. या उपक्रमासाठी पुणे महापालिकेने कायमच भरीव योगदान दिले आहे.

सुदृढ आरोग्य आणि सुखी आयुष्य जगण्यासाठी ही मॅरेथॉन प्रेरणा देत आली आहे. आरोग्याच्या या आनंदसोहळ्यात पुणेकरांनी सहभागी व्हावे, असे आवाहन पुणे महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक विक्रम कुमार यांनी केले आहे.

‘सकाळ’च्या वतीने ‘हाफ मॅरेथॉन’चे आयोजन २०१८ पासून केले जाते. यामध्ये २१ किलोमीटर, १० किलोमीटर, ५ किलोमीटर आणि ३ किलोमीटर या चार प्रकारांचा समावेश आहे. अतिशय नेटक्या नियोजनामुळे या सर्व प्रकारांतील मॅरेथॉनला पुणेकर भरभरून प्रतिसाद देतात. अनेकजण दरवर्षी न चुकता सहकुटुंब या मॅरेथॉनमध्ये सहभागी होतात, असेही त्यांनी सांगितले.

विक्रम कुमार म्हणाले, ‘‘पुणेकरांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी महापालिकेने कायमच पुढाकार घेतला आहे. हॅकेथॉनच्या माध्यमातून व्यायाम करत ‘शहर स्वच्छता’ हा उपक्रम राबविला जातो. त्यामध्ये हजारो पुणेकर सहभागी होतात. तसेच सायकल क्लबच्या माध्यमातून सुदृढ आरोग्यासाठी जनजागृती केली जाते. त्यासही आरोग्यप्रेमी आणि सायकलप्रेमींचा चांगला प्रतिसाद मिळतो.

या उपक्रमांप्रमाणे ‘सकाळ’तर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या ‘बजाज अलियान्झ पुणे हाफ मॅरेथॉन’ला महापालिकेने कायमच प्रोत्साहन दिले आहे. १० डिसेंबरला म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथून पहाटे पाच वाजल्यापासून मॅरेथॉनला सुरुवात होणार आहे. वेगवेगळ्या प्रकारांत २५ हजारांपेक्षा जास्त पुणेकर यामध्ये सहभागी होणार आहेत. महापालिकेने धावपटूंसाठी मॅरेथॉनच्या मार्गावर स्वच्छतागृहांसह इतर सुविधा पुरविण्यासाठी तयारी सुरू केली आहे.

‘सकाळ’तर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या ‘हाफ मॅरेथॉन’ला महापालिकेचे सहकार्य आहे. केवळ धावण्यासाठी नव्हे तर स्वतःच्या क्षमतेचा कस लावणारी ही स्पर्धा आहे. तेव्हा तुम्ही तुमचे उद्दिष्ट कमीतकमी वेळात पूर्ण कराल, त्यावेळी तुमचा आत्मविश्‍वास वाढलेला असेलच; पण हा आनंद तुम्हाला वेगळी अनुभूती देऊन जाईल.

- विक्रम कुमार, आयुक्त, महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray Video: उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ व्हायरल; 'जय गुजरात'चा दिला होता नारा

Pune Kondhwa Rape Case : पुणे 'कुरियर बॉय' बलात्कार प्रकरण; आरोपीस अटक अन् धक्कादायक माहितीही उघड!

Sushil Kedia Tweet: देवेंद्रजी आणि अमितजी मला वाचवा! माझ्याविरोधात मोठी मोहीम...; सुशील केडियांची संरक्षणासाठी धाव

IND vs ENG 2nd Test: २४ वर्षांच्या पोराचे शतक! जेमी स्मिथ-हॅरी ब्रूक्सच्या खेळीने इंग्लंडचा पलटवार; गौतम गंभीरचा फसला प्लॅन

Ulhasnagar Crime : दारू पार्टीतील किरकोळ वादातून मित्राकडून मित्राचा खून; आरोपी शकील शेखला बेड्या

SCROLL FOR NEXT