अटक sakal media
पुणे

आरोग्य विभाग पेपरफुटी प्रकरण : मुख्य प्रशासकीय अधिकाऱ्यासह पाच जणांना अटक

पुणे सायबर पोलिसांची कामगिरी

सकाळ वृत्तसेवा

पुणे : आरोग्य विभाग पेपरफुटी प्रकरणात पुणे पोलिसांच्या सायबर पोलिसांनी लातूर येथील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य प्रशासकीय अधिकाऱ्यासह पाचजणांना अटक केली. या प्रकरणामधील आरोपींची संख्या आता 11 वर पोचली आहे. विशेषतः अटक केलेल्या आरोपींमध्ये डॉक्‍टर, शिक्षक, निवृत्त लष्करी जवानांचा समावेश आहे.

लातुर सार्वजनिक आरोग्य विभागाचा मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रशांत व्यंकटराव बडगिरे (वय 50, रा. योगेश्वरी नगरी, अंबेजोगाई, बीड) डॉ. संदीप त्रिंबकराव जोगदंड (वय 36, रा. एकात्मता कॉलनी, अंबेजोगाई, बीड), उद्धव प्रल्हाद नागरगोजे (वय 36, रा. तितरवणे, शिरूर कासार, बीड), शाम महादू म्हस्के (वय 38, रा. पंचशीलनगर, अंबेजोगाई, जि. बीड), राजेंद्र पांडुरंग सानप (वय 51, रा. शामनगर, बीड) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहे. तर यापुर्वी विजय मुऱ्हाडे, अनिल गायकवाड, बबन मुंढे, सुरेश जगताप, संदीप भुतेकर, प्रकाश मिसाळ यांना अटक केली आहे.

आरोग्य विभागाच्या पेपरफुटी प्रकरणामध्ये आरोग्य विभागाच्या मुख्य प्रशासकीय अधिकारी स्मिता कारेगावकर यांनी सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यावरुन सायबर पोलिसांकडून तपास सुरू होता. प्रारंभी मुऱ्हाडे, गायकवाड यांना, त्यानंतर मुंढे, जगताप, भुतेकर व मिसाळ यांना अटक करण्यात आली होती. तर सोमवारी रात्री मुख्य प्रशासकीय अधिकारी बडगिरे याच्यासह अन्य आरोपींना अटक करण्यात आली. आरोपींना शिवाजीनगर न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना न्यायालयाने त्यांना 12 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अतिरिक्त पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलिस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. एस. हाके, पोलिस उपनिरीक्षक अमोल वाघमारे, संदेश कर्णे, नवनाथ जाधव, शिरीष गावडे, प्रसाद पोतदार यांच्या पथकाने हि कारवाई केली.

बडगिरेच सुत्रधार असण्याची शक्‍यता

लातूर आरोग्य विभागाचा मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रशांत बडगिरे हाच सुत्रधार असण्याची दाट शक्‍यता पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे. त्यानेच अंबेजोगाई येथील मनोरूग्णालायातील डॉ.संदीप जोगदंड याच्याकडून दहा लाख रुपये व शाम म्हस्के याच्याकडून पाच लाख रुपये घेतल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. बडगिरे याने प्रश्‍नपत्रिका कोठून मिळविली, त्याला कोणी मदत केली व या प्रकरणामध्ये आणखी किती जणांचा सहभाग आहे, याचा तपास सायबर पोलिस करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT