पुणे

म्हाडाच्या पुणे मंडळाच्या ७९२ सदनिकांची गुरूवारी सोडत

CD

‘म्हाडा’ पुणे मंडळाच्या
सदनिकांसाठी उद्या सोडत

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ : ‘म्हाडा’च्या पुणे येथील ताथवडे टप्पा-२ गृहनिर्माण योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील २४ आणि मध्यम उत्पन्न गटातील ७६८ सदनिका अशा एकूण ७९२ सदनिकांच्या विक्रीसाठी लाॅटरी जाहीर केली होती. त्यानुसार आलेल्या १,४२२ अर्जांची गुरुवारी (ता. २५) दुपारी १२.३० वाजता संगणकीय सोडत काढली जाणार आहे. पुणे मंडळाचे सभापती शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते मंडळाच्या कार्यालयातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात सोडत काढण्यात येणार आहे. पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे ताथवडे पुणे टप्पा-२ गृहनिर्माण योजनेअंतर्गत २४ सदनिका अल्प उत्पन्न गटासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. प्रति सदनिकेची किंमत ४६ ते ४७ लाख रुपयांदरम्यान असून, बांधकामाचे क्षेत्रफळ ७५.९६ ते ७७.९९ चौरस मीटर आहे. याच प्रकल्पात मध्यम उत्पन्न गट योजनेअंतर्गत ७६८ सदनिका असून, प्रति सदनिकेची किंमत ६४.५० ते ६५.५० लाख रुपयांदरम्यान आहे व बांधकामाचे क्षेत्रफळ ८९.१५ ते ९१.१८ चौरस मीटर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Student Agitation : एमपीएससी विद्यार्थ्यांचा रविवारी एल्गार! एसएम जोशी पुलावर ठिय्या आंदोलनाचा इशारा

National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी, राहुल गांधींचं दिल्ली उच्च न्यायालयात उत्तर; ईडीच्या कारवाईवर घेतला आक्षेप

Pune News : पाझर तलावांचा साठा घटला; पाणी उपशावर निर्बंध, झेडपीच्या जलव्यवस्थापन समितीकडून अधिकाऱ्यांना निर्देश

Modi Cabinet: उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार? मोदींची दोन दिवसीय चिंतन बैठक कशासाठी?

हा तर दरोडा! कॅन्सरच्या २७०० रुपयांच्या औषधाची MRP २७ हजार, रुग्णांच्या लुटीवर अधिकारी गप्प का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

SCROLL FOR NEXT