अनधिकृत होर्डिंग.  Sakal
पुणे

पुणे : बेकायदा होर्डिंगसाठी मोजावे लागणार ५० हजार

प्रशासनाने हे धोरण तयार केले असले तरी याची प्रत्यक्षात अंमलबजावणी होते की धोरण कागदावरच राहणार हे येत्या काळात स्पष्ट होईल.

​ ब्रिजमोहन पाटील

पुणे : शहरात बेकायदा आकाशचिन्ह फलक (होर्डिंग), फ्लेक्स, बॅनर लावून विद्रूपीकरण केले जात असताना त्यावर कडक कारवाई करण्यासाठी पुणे महापालिकेच्या आकाश चिन्ह विभागाने नवे धोरण तयार केले आहे. यामध्ये बेकायदा होर्डिंग लावणाऱ्याला ५० हजार रुपये दंड ठोठावला जाणार आहे, हा दंड जर भरला नाही तर संबंधित जागा मालकाच्या जागेवर बोजा चढवला जाणार आहे. प्रशासनाने हे धोरण तयार केले असले तरी याची प्रत्यक्षात अंमलबजावणी होते की धोरण कागदावरच राहणार हे येत्या काळात स्पष्ट होईल.

आउट डोअर मार्केटींगसाठी राजकारणी, कंपन्या हे मोठ्या होर्डिंगला प्राधान्य देतात. शहरातील मोक्याचे चौक, रस्ते या ठिकाणी होर्डिंग लागावेत यासाठी हजारो रुपये देण्याची त्यांची तयारी असते. महापालिकेच्या माहितीनुसार शहरात सध्या अधिकृत २ हजार २०० होर्डिंग आहेत. त्यातून दरवर्षी २५ कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षीत आहे. पण न्यायालयीन प्रकरणांमुळे अनेक ठेकेदार व जाहिरात कंपन्या पैसे भरत नाहीत. यंदाच्या वर्षी केवळ ६ कोटी रुपये महापालिकेच्या तिजोरीत जमा झाले आहेत.

शहरात मोठ्या होर्डिंगप्रमाणे चौकाचौकात लागणारे बेकायदा बॅनर, बोर्ड, झेंडे यांचाही प्रश्‍न गंभीर आहे. शहरात राजकीय कार्यक्रम असल्यास किंवा नेत्याचा वाढदिवस असला तरी चौकच्या चौक बेकायदा बॅनर, होर्डिंगने भरून जातात. त्यावर कारवाई केली जात नाही. पण आता महापालिकेने तयार केलेल्या धोरणात थेट आर्थिक दंडाची तरतूद केली आहे.

विलंब केल्यास दंड

जाहिरात फलक, नामफलक यांची मुदत संपल्यानंतर नूतनीकरण करण्यास ३ महिन्यापर्यंत उशीर केल्यास मासिक आकारणी योग्य शुल्काच्या २५ टक्के, ६ महिन्यापर्यंत उशीर झाला तर ५० व त्यापुढे उशीर झाला तर १०० टक्के विलंब शुल्क घेतले जाणार आहे.

झेंडा लावला तरी १ हजाराचा दंड

राजकीय कार्यक्रमांना रस्त्याच्या कडेने, दुभाजकावर झेंडे लावले जातात. त्यासाठी परवागनी दिलेली नसते. यापुढे अशा प्रकारे झेंडा, बोर्ड, बॅनर लावल्यास थेट दंड केला जाणार. १ ते १० बोर्ड किंवा झेंडे लावणाऱ्यास कमीत कमी १ हजाराचा दंड असले. १० पेक्षा जास्त बोर्ड, झेंडे लावणाऱ्यास ५ हजाराचा दंड असणार आहे.

अनधिकृत होर्डिंगवर अशी होणार कारवाई

  • - बृहनमुंबई महापालिका धोरणानुसार ५० हजार रुपये प्रति जाहिरात दंड

  • - हा खर्च जाहिरात लावणाऱ्या संस्था, व्यक्तीकडून वसूल होणार

  • - मुदतीत दंड न भरल्यास जागा मालकाकडून दंड वसूल होणार

  • - जागा मालकाने मुदतीत दंड न भरल्यास त्याच्या मिळकतीच्या जागेवर बोजा चढविला जाणार

‘‘आकाशचिन्ह विभागाने नवे धोरण लागू केले आहे. त्यानुसार होर्डिंग, फ्लेक्स, बोर्ड, झेंडे यावर कारवाई केली जाईल. ही कारवाई क्षेत्रीय कार्यालयाच्या माध्यमातून ही कारवाई केली जाईल. यंदाच्या वर्षभरापासून ७ ते ८ लाखाचा दंड वसूल केला आहे. तर न्यायालयीन प्रकरणांमुळे अनेक व्यावसायिक शुल्क भरत नसल्याने सध्या वर्षाला ६ कोटीचे उत्पन्न मिळत आहे.’’

- विजय लांडगे, उपायुक्त, आकाश चिन्ह विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्रज्वल रेवन्नाचा आणखी एक कारनामा; तुरुंगात जप्त केलेल्या मोबाइलमध्ये सापडले १४५ हून अधिक अश्लील व्हिडीओ

IND vs WI: ऋतुराज गायकवाड, रिषभ पंत, जडेजाचे पुनरागमन होणार? वेस्ट इंडिजविरुद्धच्या ODI मालिकेसाठी का होणार संघात बदल

हरतालिकेची पूजा का करतात? एका क्लिकमध्ये वाचा व्रताचे महत्त्व!

'मी जे केलं ते तुम्ही करू नका...' सिंगल मदरहुडबद्दल नीना गुप्तांचं स्पष्ट वक्तव्य, म्हणाल्या...

Marathi News Live Updates : गंगा नदीत बुडणाऱ्या १० बांगलादेशी नागरिकांची वाचवण्यात बीएसएफला यश

SCROLL FOR NEXT