Jica Project Sakal
पुणे

Jica Project : जायका प्रकल्पातील अभियंत्यांच्या बदल्या रद्द

पुणे शहरातील नदी स्वच्छ करण्यासाठी व मैलापाण्याची समस्या सोडविण्यासाठी ‘मुळामुठा नदी सुधार प्रकल्पा’चे प्रत्यक्षात काम झाल्यानंतर या कामाची जबाबदारी असलेल्या अभियंत्यांच्या अचानक बदल्या केल्याने कामात अडथळे निर्माण झाले होते.

सकाळ वृत्तसेवा

पुणे शहरातील नदी स्वच्छ करण्यासाठी व मैलापाण्याची समस्या सोडविण्यासाठी ‘मुळामुठा नदी सुधार प्रकल्पा’चे प्रत्यक्षात काम झाल्यानंतर या कामाची जबाबदारी असलेल्या अभियंत्यांच्या अचानक बदल्या केल्याने कामात अडथळे निर्माण झाले होते.

पुणे - शहरातील नदी स्वच्छ करण्यासाठी व मैलापाण्याची समस्या सोडविण्यासाठी ‘मुळामुठा नदी सुधार प्रकल्पा’चे (जायका प्रकल्प ) प्रत्यक्षात काम झाल्यानंतर या कामाची जबाबदारी असलेल्या अभियंत्यांची अचानक बदल्या केल्याने कामात अडथळे निर्माण झाले होते. अखेर या बदल्या रद्द करून पूर्वीप्रमाणे काम सुरू ठेवण्याचे आदेश आयुक्त विक्रम कुमार यांनी दिले आहेत.

शहरात निर्माण होणारे मैलापाणी मिश्रित पाणी थेट नदीत जात असल्याने पर्यावरणाची हानी झाली आहे. हे प्रदूषण रोखण्यासाठी म्हणून जायका कंपनीच्या अर्थसहाय्याने १४७३ कोटी रुपयांच्या मुळामुठा नदी सुधार प्रकल्पाचे काम सुरू झाले आहे. आत्तापर्यंत या प्रकल्पाचे मलवाहिनी टाकण्याच्या सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे. नायडू, भैरोबा आणि धानोरी येथील मैलाशुद्धीकरण प्रकल्पाचे काम सुरू झाले आहे.

उर्वरित ठिकाणचे कामाचे अंतिम आराखडे मंजूर झालेले आहेत. या कामावर देखरेख ठेवण्यासाठी केंद्र सरकारच्या सूचनेनुसार पुणे महापालिकेने ‘प्रकल्प अंमलबजावणी कक्ष’ (प्रोजेक्ट इंप्लिमेंटेशन युनिट - पीआययू) स्थापन केला आहे. त्यात ३३ अधिकाऱ्यांचा समावेश आहे, हा प्रकल्प पूर्ण होई पर्यंत यातील एकाही अधिकाऱ्यांची बदली करू नये, अपवादात्मक स्थितीत बदली केली तर त्यासाठी आयुक्तांची मान्यता घ्यावी असे आदेश २५ मार्च २०२२ रोजी आयुक्त विक्रम कुमार यांनी काढले होते. या ३३ अधिकाऱ्यांची यादी केंद्र सरकारलाही पाठविण्यात आली आहे.

पण महापालिका प्रशासनाने या कक्षातील अभियंत्यांच्या परस्पर बदल्या केल्याने प्रकल्पाच्या कामात अडथळे निर्माण झाले. त्याबाबत ‘सकाळ’ने वृत्त प्रकाशित केले होते.  हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर आयुक्त विक्रम कुमार यांनी जायका प्रकल्प अंमलबजावणी कक्षातील अभियंत्यांच्या बदल्या रद्द करून त्यांना पुन्हा या कामात आणण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले. त्यानुसार बदल्या झालेल्या अधिकाऱ्यांनी पुन्हा काम सुरू केले आहे.

आयुक्त विक्रम कुमार म्हणाले, ‘जायका प्रकल्पाच्या कामातील ज्या अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या, त्या रद्द करण्यात आल्या आहेत. हे अभियंते पुन्हा विभागात काम करायला सुरवात केली. आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शरद पवारांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, दुष्काळासंदर्भात केल्या १७ मागण्या

Premanand Maharaj Disciple Death : आश्रमाच्या छतावरून खाली पडले अन् मृत्यू; प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यूचं गूढ कायम

Competitive Exam Success Story: जिद्द, चिकाटी अन् मेहनतीला यशाची साथ; तीन माजी विद्यार्थ्यांची यशाला गवसणी, जिल्हा परिषद शाळेची यशोगाथा

IND vs WI 1st ODI Live: विराट कोहलीचा महापराक्रम! तेंडुलकरनंतर वन डेत असा विक्रम नोंदवणारा पहिलाच; शुभमन गिलचेही शतक

Latest Marathi News Live Update : गडचिरोलीत वाघाचे अवयव आणि २ खवले मांजर जप्त

SCROLL FOR NEXT