Crime Sakal
पुणे

Video Viral: पुण्यातील टिळक रोडवर तरूणांची फ्री स्टाईल हाणामारी

हातात दगड घेऊन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न

सकाळ डिजिटल टीम

पुणे : पुण्यातील टिळक रोडवरील जोंधळे चौकात तरुणांची फ्री स्टाईल हाणामारी पाहायला मिळाली आहे. १० ते १२ तरुणांकडून एका तरूणाला जबर मारहाण करण्यात आली आहे. त्याचबरोबर हातात दगड घेऊन दहशत निर्माण करण्याचाही प्रयत्न करण्यात आला आहे. हाणामारीचं कारण अद्याप स्पष्ट झालं नसून या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

(Pune Crime News)

जोंधळे चौकात दहा बाराजण एका तरूणाला बेदम मारहाण करताना या व्हिडिओत दिसत आहेत. या घटनेनंतर विश्रामबाग पोलिसांनी गुन्हेगाराला अटक केली आहे. सात जणांना अटक करण्यात आली असून अधिक तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

पूर्व वैमनस्यातून हे भांडणं झाले असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. त्यानंतर पोलिसांकडून त्यांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेले तरूण हे सिंहगड रोडवरून आले असल्याचं पोलिसांनी सांगितलं. दहा ते बारा तरूणांकडून एका तरूणाला मारहाण करण्यात येत असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे. तसेच एकजण हातात दगड घेऊन दहशत पसरवण्याचं काम करत आहे. याबाबत सात तरूणांना पोलिसांकडून अटक करण्यात आली असून घटेनेचा तपास सुरू असल्याचं सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT