Train
Train sakal
पुणे

ख्रिसमससाठी पुणे-करमळी विशेष रेल्वे

सकाळ वृत्तसेवा

पुणे - ख्रिसमस तसेच नववर्षाच्या निमित्ताने मध्य रेल्वेतर्फे प्रवाशांसाठी पुणे स्थानकापासून गोव्यातील पणजीजवळील करमळी स्थानकापर्यंत विशेष रेल्वे सोडण्याचा निर्णय जाहीर केला आहे. १७ डिसेंबर २०२१ पासून सुरू होणारी ही रेल्वे ९ जानेवारी २०२२ पर्यंत कार्यरत असेल.

या कालावधीत पुणे-करमळी गाडी क्रमांक ०१२९१ दर शुक्रवारी पुणे स्थानकातून सायंकाळी ५ वाजून ३० मिनिटांनी रवाना होईल, आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजता करमळी येथे पोहचेल. तर करमळी-पुणे गाडी क्रमांक ०१२९२ दर रविवारी करमळी स्थानकातून सकाळी ९ वाजून २० मिनिटांनी रवाना होईल, आणि रात्री ११ वाजून ५० मिनिटांनी पुणे येथे पोहचेल.

यादरम्यान ही गाडी लोणावळा, कल्याण, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर, रत्नागिरी, आडवली, राजापूर, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी आणि थिविम या स्थानकांवर थांबेल. या रेल्वेत एक एसी टू टीयर, चार एसी थ्री टीयर, ११ स्लीपर आणि ४ सेकंड सीटिंग कोच असतील. या रेल्वेचे आरक्षण २८ नोव्हेंबरपासून उपलब्ध असेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: Ram Naik: मुंबईतील कुलाबा येथील मतदान केंद्रावर सुरक्षा व्यवस्था वाढवली

Sakal Podcast : लोकसभेच्या पाचव्या टप्प्याचं आज मतदान ते रोहित शर्मा IPL ब्रॉडकास्टरवर भडकला

Loksabha Election : राज्यात आज अखेरचा टप्पा;मुंबई, नाशिकसह देशभरातील ४९ मतदारसंघांत मतदान

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 20 मे 2024

IPL 2024: अखेर साखळी फेरीची सांगता झाली अन् दुसऱ्या क्रमांकाची रस्सीखेच हैदराबादानं जिंकली

SCROLL FOR NEXT