Drainage water
Drainage water 
पुणे

पुणे : गोकुळनगरमध्ये ड्रेनेजचे पाणी रस्त्यांवर

सकाळ वृत्तसेवा

कात्रज : कोंढवा रस्त्यांवरील गोकुळनगरमधील लेन क्रमांक १२मध्ये ड्रेनेजचे पाणी रस्त्यांवर येऊन ते सासायट्यांच्या पार्किंगमध्ये जात आहे. सहा महिन्यांपूर्वीच याठिकाणी ड्रेनेजलाईनचे काम करण्यात आले आहे. मात्र, तरीही 'परिस्थिती जैसे थी' असून मागील सहा महिन्यांपूर्वी एवढ्या मोठ्या प्रमाणांत खोदकाम करत प्रशासनाने नेमके काय काम केले आहे? असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत.

संडासाचे पाणी आमच्या सासायटीत येत असेल तर इथे राहायचे कसे? असा प्रश्न आयडियल पार्क, फ्लॉवर रेसिडेन्सी, यशोधन रेसिडेन्सी, अक्षरा रेसिडेन्सी, पवन पार्क आदी सोसायट्यांमधील नागरिकांचा आहे. लेन क्रमांक १२मधील ड्रेनेजचे चेंबर तुंबले असून त्यामधून एखाद्या ओढ्यासारखे पाणी वाहत आहे. हे दुर्गंधीयुक्त पाणी संपूर्ण रस्त्यांवरून जाऊन ओढ्याला मिळते. संपूर्ण रस्ता ड्रेनेजच्या पाण्याने व्यापून टाकला असल्याने नागरिकांना चालायचे कसे? हा प्रश्न उपस्थित होत आहे. ड्रेनेजचे पाणी रस्त्यांवर येत असतानाच पावसाची भर पडली असून पावसाचेही पाणी मोठ्या प्रमाणावर रस्त्यांवरून वाहत आहे. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी तर परसरलीच आहे. शिवाय, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर उपस्थित झाला आहे.

२ ते अडीच हजार नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. महापालिकेकडून यापूर्वीही याठिकाणी खोदकाम करत ड्रेनेजलाईनचे काम करण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, पावसाळ्यात हा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला असल्याने पालिका प्रशासनाने नेमके काय काम केले हे समजत नाही.

- पुष्पा सस्ते, स्थानिक नागरिक

कात्रज-कोंढवा रस्त्यांवर कोठेतरी पावसाळी लाईनला ड्रेनेजलाईन जोडण्यात आली असावी. त्यामुळे हा प्रकार घडत असावा. यापुढे नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घेण्यात येईल. तसेच, याठिकाणी पुन्हा ड्रेनेजचे पाणी रस्त्यांवर येऊ नये म्हणून उपाययोजना करण्यात येतील.

- शशिकांत निवदेकर, कनिष्ठ अभियंता, ड्रेनेज विभाग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT