mahsul vibhag sakal
पुणे

Pune : कात्रज मंडल अधिकारी कार्यालयातील रावसाहेबांच्या कारभारामुळे नागरीक त्रस्त

कात्रज मंडल अधिकारी कार्यालयांतर्गत खेड-शिवापूर तलाठी सजातील अनेक गावे येतात.

महेंद्र शिंदे

खेड-शिवापूर : नागरीकांना न भेटणे, फोन न उचलणे या कात्रज मंडल अधिकारी कार्यालयातील रावसाहेबांच्या कारभारामुळे नागरीक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे नागरीकांची विविध कामे होण्यास सुमारे तीन-तीन महिन्यांच्या कालावधी लागत आहे. रावसाहेबांच्या या कारभारामुळे नागरीकांची गैरसोय होत आहे. त्याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी नागरीक करत आहेत.

कात्रज मंडल अधिकारी कार्यालयांतर्गत खेड-शिवापूर तलाठी सजातील अनेक गावे येतात. त्यामुळे सातबारा संबंधीच्या वेगवेगळ्या कामासाठी नागरीकांना कात्रज येथील मंडल अधिकारी कार्यालयात जावे लागते. मात्र येथील कार्यालयात अनेकदा रावसाहेब अनुपस्थित असतात. रावसाहेब नागरीकांना भेटत नाहीत, नागरीकांचे फोन उचलत नाहीत. त्यामुळे नागरीकांची कामे वेळेवर होत नसल्याने नागरीक त्रस्त झाले आहेत. असा अनुभव अनेक नागरीकांना येतो आहे. अखेर वैतागून नागरीकांना तलाठी सजातील काही जणांच्या माध्यमातून रावसाहेबांशी सोईस्कर संपर्क साधावा लागतो. त्यानंतर मग संबंधितांचे काम केले जाते. तोपर्यंत हे काम होण्यासाठी सुमारे तीन महिन्याचा कालावधी लोटलेला असतो.

अशा या रावसाहेबांच्या कारभाराने नागरीक त्रस्त झाले आहेत. सामान्य नागरीकांना हातातील कामे सोडून मंडल अधिकारी कार्यालयात फेऱ्या माराव्या लागत आहेत. रावसाहेबांच्या या कारभाराच्या तक्रारी केल्या तर आपले काम केले जाणार नाही, या भीतीने कोणी उघडपणे वरिष्ठांकडे रावसाहेबांची तक्रार करत नाहीत.

मात्र एखादे काम करण्यासाठी तीन महिने पाठपुरावा करावा लागतो. रावसाहेब भेटत नाहीत, फोन उचलत नाहीत, मग त्यांच्याशी सोईस्कर संपर्क केल्यावर आपली कामे होतात, असा अनुभव काही नागरीकांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितला. रावसाहेबांच्या अशा या कारभारामुळे त्रस्त झालेल्या नागरीकांच्या तक्रारीची दखल वरिष्ठ अधिकारी घेणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

याबाबत हवेलीचे प्रांताधिकारी संजय आसवले म्हणाले, "या प्रकाराची माहिती घेण्यात येईल. तसेच संबंधित मंडल अधिकाऱ्यांना योग्य ती समज देण्यात येईल."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : मुंबईत पावसाची संततधार, समुद्राला मोठी भरती

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

लेकाचा मृतदेह आला पण फुफ्फुस, हृदयासह अवयव गायब; फक्त डोकं आणि असंख्य टाक्यांनी शिवलेलं धड

शी... हे काय वागणं! ५२ वर्षांच्या राम कपूरने २५ वर्षीय मुलाला जबरदस्ती केलं किस; 'लॉकअप' २ चा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT