Katraj Elephant
Katraj Elephant Sakal
पुणे

वाघोबा-नागोबांसह सारेच प्राणी-पक्षी मस्त!

सकाळ वृत्तसेवा

पुणे - पुणेकरांबरोबरच देश-परदेशातील पर्यटकांसाठी (Tourist) आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेले कात्रज (Katraj) येथील राजीव गांधी प्राणिसंग्रहालय (Rajiv Gandhi Zoo) कोरोनामुळे (Corona) वर्षापासून बंद (Close) आहे. त्यामुळे संग्रहालयाला तिकीट विक्रीतून मिळणारे उत्पन्नही (Income) थांबले आहे; पण येथील प्राण्यांच्या पोटाला चिमटा बसू नये, यासाठी महापालिकेकडून (Municipal) पुरेपूर दखल घेण्यात येत आहे. ना माणसांची गर्दी, ना खाण्यापिण्याची कमी यामुळे येथील वाघोबा-नागोबांसह सारेच प्राणी-पक्षी मस्त आहेत. (Pune Katraj Rajiv Gandhi Zoo)

कोरोना विषाणूचा प्रसार वाढू नये म्हणून गेल्या वर्षी मार्चपासून लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे शहरात सर्व काही बंद ठेवण्यात आले होते. त्यात उद्यानांचा देखील समावेश आहे. कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर उद्याने ठरावीक वेळेसाठी खुली करण्यात आली होती. मात्र कात्रज येथील प्राणी संग्रहालय बंदच ठेवण्यात आले होते. हे संग्रहालय अद्याप बंदच आहे. त्यामुळे दरवर्षी तिकीट विक्रीतून मिळणारे सुमारे साडेपाच कोटी रुपयांचे उत्पन्न थांबले आहे. तिकीट विक्रीतून जमा होणारे पैसे महापालिकेकडे जमा होतात.

तिकीट विक्रीतून आलेले उत्पन्न हे संग्रहालयातील विकासकामे व प्राण्यांच्या चाऱ्यासह इतर बाबींना लागणारा निधी संग्रहालयास महापालिकेकडून देण्यात येतो. परंतु अद्याप संग्रहालय बंद असल्यामुळे प्राण्यांच्या देखभालीवर कोणताही परिणाम होऊ नये यासाठी महापालिका निधी उपलब्ध करून देत असल्याची माहिती संग्रहालयाकडून देण्यात आली.

जंगल कॅटसह शेकरू येणार

विविध प्राणी-पक्ष्यांचा समावेश असलेल्या या संग्रहालयात आता तीन नवीन प्राण्यांची भर पडणार आहे. जंगल कॅट, लेपर्ड कॅट आणि महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरू आता संग्रहालयात पाहता येणार आहे. त्यांच्यासाठी आवश्‍यक असलेल्या निवाऱ्याची व्यवस्था सध्या करण्यात येत आहे, अशी माहिती संग्रहालयाचे संचालक डॉ. राजकुमार जाधव यांनी दिली.

प्राण्यांच्या देखभालीसाठी आवश्‍यक असलेला पुरेसा निधी पालिका प्रशासनाकडून देण्यात येत आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांचा पगार, प्राण्यांना लागणारे खाद्य अशा विविध गोष्टींचा समावेश आहे. सध्या संग्रहालय कधी सुरू होर्इल, याबाबत निश्‍चित सांगता येणार नाही.

- डॉ. राजकुमार जाधव, संचालक, स्व. राजीव गांधी प्राणी संग्रहालय, कात्रज

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT