प्रांजली पिसे
प्रांजली पिसे sakal
पुणे

Pune : केडगावच्या प्रांजली पिसे हिची BCCI कडून निवड

रमेश वत्रे

केडगाव : केडगाव ( ता.दौंड ) येथील प्रांजली सोमा पिसे हिची १५ वर्षाखालील क्रिकेट संघात बीसीसीआयने निवड केली आहे. महाराष्ट्र संघासाठी प्रांजलीची निवड झाली आहे. एक दिवसीय साखळी क्रिकेट स्पर्धा रांची ( झारखंड ) व जयपूर ( राजस्थान ) येथे सुरू आहेत. रणजी संघाचे माजी कर्णधार निखील पराडकर हे प्रांजलीचे प्रशिक्षक आहेत.

गेल्या तीन वर्षापासून पराडकर हे प्रांजलीला प्रशिक्षण देत आहे. डी.वाय. पाटील महाविद्यालयात झालेल्या १५ वर्षाखालील स्पर्धेत उपांत्य फेरीत प्रांजली सामनावीर ठरली आहे. बी.व्ही. राव स्मृती करंडक स्पर्धेत युथ स्पोटर्स क्लबला विजय मिळवून दिल्याने प्रांजलीला सामनावीर म्हणून गौरविले आहे. मास्टर्स क्रिकेट स्पर्धेत प्राजंलीने ३४ धावा देत ५ फलंदाज बाद केले आहेत. या कामगिरीमुळे प्रांजली सामनावीर ठरली.

प्रांजली बोरीपार्धी ( ता.दौंड ) येथील समाजसेवक शिवाजीराव जेधे विद्यालयात नववीच्या वर्गात शिकत आहे. प्रांजली गेल्या तीन वर्षापासून सरावासाठी केडगाव ते पुणे येथे रोज प्रवास करत आहे. प्रांजलीच्या निवडीबद्दल तीचे परिसरात कौतुक होत आहे.

या यशाबद्दल प्रांजली म्हणाली, ''बीसीसीआयकडून महाराष्ट्र संघासाठी माझी निवड होईल हे अपेक्षित होते. भारतासाठी खेळायचे आणि विजेतेपद मिळवायचे हे स्वप्न आहे. गेली तीन वर्ष मी रोज सकाळ, दुपार, सायंकाळी एकूण आठ तास सराव करते. माझे वडील सोमा पिसे व माझे प्रशिक्षक निखील पराडकर यांनी माझ्यासाठी खूप मेहनत घेतली आहे.''

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

Ebrahim Raisi: इराणच्या अध्यक्षांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचा अझरबैजानमध्ये अपघात, बचावपथक रवाना

RCB खेळाडूंशी हस्तांदोलन न करताच परत गेलेल्या धोनीच्या शोधात विराटची CSK च्या ड्रेसिंग रुममध्ये धाव? Video व्हायरल

IPL 2024 RR vs KKR Live Score: राजस्थान-कोलकाता सामन्यात पावसाचा व्यत्यय; टॉसला उशीर

SCROLL FOR NEXT