Crime News  esakal
पुणे

Pune Crime : अल्पवयीन विद्यार्थ्याचे अपहरण करुन काढले विवस्त्र फोटो; चार अल्पवयीन मुले ताब्यात

कनिष्ठ महाविद्यालयात घुसून टोळक्‍याने अल्पवयीन मुलाचे अपहरण करुन त्याचे विवस्त्र फोटो काढून त्याच्याकडे भांडण झालेल्या मुलांना घेऊन येण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

कनिष्ठ महाविद्यालयात घुसून टोळक्‍याने अल्पवयीन मुलाचे अपहरण करुन त्याचे विवस्त्र फोटो काढून त्याच्याकडे भांडण झालेल्या मुलांना घेऊन येण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

पुणे - कनिष्ठ महाविद्यालयात घुसून टोळक्‍याने अल्पवयीन मुलाचे अपहरण करुन त्याचे विवस्त्र फोटो काढून त्याच्याकडे भांडण झालेल्या मुलांना घेऊन येण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हि घटना गुरुवारी दुपारी दत्तवाडी परिसरात घडली. याप्रकरणी दत्तवाडी पोलिसांनी चार अल्पवयीन मुलांसह काही जणांना ताब्यात घेतले आहे.

याप्रकरणी पिडीत मुलाच्या वडिलांनी दत्तवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या एका अल्पवयीन मुलावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत मुलगा एका कनिष्ठ महाविद्यालयात 11 वीमध्ये शिक्षण घेत आहे. बुधवारी संबंधित मुलगा घरी जात असताना तळजाई येथे दोन गटांमध्ये भांडणे सुरु होती. तेव्हा, पिडीत मुलगा हा तेथे त्यांची भांडणे पाहत थांबला होता.

संबंधित मुलानेच आपल्याला मारण्यासाठी मुले पाठविल्याचा समज झाला. त्या रागातुनच त्यानी गुरुवारी दुपारी संशयित पिडीत मुलाच्या महाविद्यालयात गेले. तेथुन त्यांनी पिडीत मुलाला त्यांच्या दुचाकीवर जबरदस्तीने बसवून आंबेगाव परिसरातील एका पत्र्याच्या शेडमध्ये नेले. तेथे आरोपींनी पिडीत मुलाला बुधवारी झालेल्या भांडणातील मुलांना घेऊन ये, असा दमदाटी केली. तसेच त्याच्या गळ्याला धारदार शस्त्र लावून त्यास जीवे मारण्याची धमकी दिली. तेवढ्यावरच न थांबता, त्यास विवस्त्र करुन त्याची छायाचित्रे काढली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivsena Political News : सचिन अहिर यांच्यानंतर ठाकरेंचा आणखी एक विश्वासू शिलेदार शिंदे गटात? सरनाईकांसोबत फोटोमुळे चर्चेला उधाण

दारुबंदी साठी महिलांचे आंदोलन सुरु असताना पती नशेत पोहोचला, पत्नीचे शिकवला कायमचा धडा

Navi Mumbai: नवी मुंबईत धक्कादायक घटना; विजेचा शॉक लागून दोन कॉलेज विद्यार्थिनी पाण्यात पडल्या; घटनेनं खळबळ

गिरगावच्या हाय-प्रोफाईलचं धक्कादायक वास्तव समोर, फक्त मराठी अभिनेत्री नाहीतर बॉलिवूड अभिनेत्रीचा झालेला सौदा

Latest Marathi News Live Update : धुळे शहरासह परिसरामध्ये तब्बल सहा ते सात दिवसांच्या दीर्घ विश्रांतीनंतर आज पावसाने लावली हजेरी

SCROLL FOR NEXT